हॉटेलात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 03:05 PM2019-11-09T15:05:18+5:302019-11-09T15:05:26+5:30

रसोई फॅमिली रेस्टॉरंट तसेच हॉटेल ब्ल्यू डायमंडवर पोलीस पथकासह छापा टाकून चार युवतींसह चार युवकांना रंगेहात पकडले.

Police arested two men who run a sex racket in a hotel | हॉटेलात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

हॉटेलात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

googlenewsNext

अकोला: रेल्वे स्टेशनवरील ब्ल्यू डायमंड आणि रसोई फॅमिली रेस्टॉरंट या दोन हॉटेलमध्ये चालणाºया सेक्स रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी पर्दाफाश केला होता. सेक्स रॅकेट चालविणाºया दोघांना पोलिसांनी शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ११ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक छाया वाघ यांना रेल्वे स्टेशनवरील दोन हॉटेलांमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून रसोई फॅमिली रेस्टॉरंट तसेच हॉटेल ब्ल्यू डायमंडवर पोलीस पथकासह छापा टाकून चार युवतींसह चार युवकांना रंगेहात पकडले. हॉटेलचे चालक व भाडेकरू प्रशांत जावरकर व सनी नवले हे ग्राहकांकडून पैसे घेऊन वेश्या व्यवसाय करीत होते. दोघांना अटक करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या चार युवती व पाच युवकांच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली आणि त्यांना सोडून देण्यात आले. आरोपी प्रशांत जावरकर व सनी नवले यांना शुक्रवारी दुपारी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोघांनाही ११ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आता या दोघा आरोपींच्या चौकशीतून आणखी काही नावे समोर येऊ शकतात. सेक्स रॅकेट चालविणाºया सूत्रधाराची माहिती समोर येऊ शकते. (प्रतिनिधी)

 

Web Title: Police arested two men who run a sex racket in a hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.