घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड; १ लाखाचा मुद्देमाल जप्त
By नितिन गव्हाळे | Published: April 5, 2023 04:52 PM2023-04-05T16:52:59+5:302023-04-05T16:53:10+5:30
कोठारी वाटिका ८ मध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातून सोन्याचे साहित्य, दुचाकी असा मुद्देमाल लंपास केला.
अकोला: शहरातील खडकी येथील कोठारी वाटिका क्रमांक ८ मध्ये एका घरफोडी प्रकरणात खदान पोलिसांनी अट्टल चोरट्याला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून एक दुचाकी, सोन्याचे दागिने असा एकूण मुद्देमाल असा एकूण १ लाख ८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कोठारी वाटिका ८ मध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातून सोन्याचे साहित्य, दुचाकी असा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणात शीतल प्रल्हाद पाखरे(३५) रा. कोठारी वाटिका यांच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी भादंवि कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करून आरोपी नितेश अमर गिरी(१९) रा. मलकापूर व एका अल्पवयीन मुलला मलकापूर परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून १७ हजार ४०० रुपयांची सोन्याचे मंगळसूत्र, ३६ हजार रुपयांची सोन्याची लगड, ५५ हजाराची दुचाकी असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस यांच्या मार्गदर्शनात डिगांबर अरखराव, विजयकुमार चव्हाण, नितीन मगर, रवी डाबेराव, रोहित पवार, संदीप ताले, आकाश राठोड आदींनी केली.