Police Commemoration Day : पोलीस स्मृतीदिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 03:06 PM2018-10-21T15:06:57+5:302018-10-21T15:07:39+5:30

अकोला - पोलीस स्मृतिदिनानिमित्त गत वर्षभरात कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झालेल्या देशातील ४१६ पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना रविवारी सकाळी पोलीस मुख्यालयामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.

Police Commemoration Day: Tribute to the victims of Police Memorial Day | Police Commemoration Day : पोलीस स्मृतीदिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली

Police Commemoration Day : पोलीस स्मृतीदिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली

Next

अकोला - पोलीस स्मृतिदिनानिमित्त गत वर्षभरात कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झालेल्या देशातील ४१६ पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना रविवारी सकाळी पोलीस मुख्यालयामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील पोलीस हवालदार सुनिल दत्तात्रय कदम, सुरेश दत्तात्रय गावडे आणि पोलीस काँस्टेबल सतीश श्रद्धाराव मडवी यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
१ सप्टेंबर २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत देशातील सर्व राज्यात पोलीस दलाचे पोलीस अधिकारी व जवान असे ४१६ जणांनी कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. अशा सर्वांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कवायतीचे नेतृत्व विकास तीडके व पोलीस अधीकाºयांनी केले. जवानांच्या नावाच्या यादीचे वाचन शोक कवायतीच्यादरम्यान करण्यात आले. यावेळी पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख कैलास नागरे, वाहतुक शाखा प्रमूख तथा सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील, खदानचे ठाणेदार संतोष महल्ले, रामदास पेठचे ठाणेदार शैलेष सपकाळ, जुने शहरचे अन्वर शेख, सिव्हील लाईन्सचे एस. मोरे, एमआयडीसीचे कीशोर शेळके, अकोट फैलचे राजु भारसाकळे उपस्थित होते.

या कारणामूळे पाळला जातो हुतात्मा दिन
लडाख भागातील सरहद्दीवर १८ हजार फुट उंचीवर हॉट स्प्रिंग्ज नावाचे ठिकाण आहे. २१ आॅक्टोंबर १९५९ रोजी या ठिकाणी गस्त चालू असताना पर्वताच्या डाव्या बाजूला तुकडीला काही संशयास्पद खुणा दिसल्या. तुकडी त्या दिशेने चालू लागली. तेव्हा त्यांच्यावर अचानक भयानक गोळीबार सुरु झाला. त्यात १० जवानांना वीर मरण आले. ९ जण जखमी झाले. त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवरही चिनी सैनिकांनी अचानक हल्ला केला होता. १३ नोव्हेंबरला चिनी सैनिकांनी या जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हॉट स्प्रिंग्ज येथे त्याच्यावर सन्मानपूर्वक अंत्यविधी करण्यात आले. त्यावेळी प्रत्येक राज्यातील पोलीस दलांनी त्या त्या ठिकाणी या वीरांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर पाटणा येथे त्या वर्षी झालेल्या अखिल भारतीय पोलीस स्पर्धाच्या वेळी सर्वांनी आमच्या या वीर हुतात्म्यांचे स्मरण आम्ही दरवर्षी २१ आॅक्टोंबरला पोलीस हुतात्मा दिन पाळून करु अशी शपथ घेतली. तेव्हापासून दरवर्षी संपूर्ण देशभर जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो.

Web Title: Police Commemoration Day: Tribute to the victims of Police Memorial Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.