प्राणघातक हल्ल्यातील आरोपी पोलीस कोठडीत

By admin | Published: April 11, 2017 01:40 AM2017-04-11T01:40:11+5:302017-04-11T01:40:11+5:30

जखमीची प्रकृती गंभीर; परस्परांविरुद्ध गुन्हा

In the police custody of a deadly assault | प्राणघातक हल्ल्यातील आरोपी पोलीस कोठडीत

प्राणघातक हल्ल्यातील आरोपी पोलीस कोठडीत

Next

अकोला: घरासमोर वाहन उभे करण्याच्या कारणावरून हमजा प्लॉटमध्ये दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणातील आरोपीस जुने शहर पोलिसांनी सोमवारी अटक केली. सदर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रिजवान खान फिरोज खान असे आरोपीचे नाव आहे.
हमजा प्लॉटमधील रहिवासी शकिला खान युसुफ खान यांनी जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पाणी वाहण्याचे वाहन हमजा प्लॉटमधील एका घरासमोर काही वेळेसाठी उभे केले होते.
या कारणावरून रिजवान खान फिरोज खान, इमरान खान फिरोज खान आणि इरफान खान फिरोज खान या तिघांनी संगनमताने शकिला खान युसुफ खान यांचा मुलगा समीर खान व नातेवाईक शेख आसीफ शेख तस्लीम या दोघांना अश्लील शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत शेख तस्लीम यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून, त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेख तस्लीम यांची प्रकृती धोक्यात आहे. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी रिजवान खान फिरोज खान, इमरान खान फिरोज खान आणि इरफान खान फिरोज खान या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0७, ५0४ आिण ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर सोमवारी पोलिसांनी रिजवान खान फिरोज खान याला अटक केली असून, त्याला न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर याच प्रकरणात इमरान खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून शकिला खान, समीर खान आणि शेख तस्लीम या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: In the police custody of a deadly assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.