३९ जणांना गंडविणार्या सराफास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 02:10 AM2017-11-02T02:10:00+5:302017-11-02T02:11:27+5:30
अकोला : जुने शहरातील प्रभू ज्वेलर्समध्ये रकमेची ठेव ठेवल्यास त्यावर अधिक जादा व्याजदरासह विविध आमिष दाखवून तब्बल ३९ जणांची ४0 लाख रुपयांनी फसवणूक करणार्या सराफा व्यावसायिकास डाबकी रोड पोलिसांनी बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी त्याच्या भावालाही अटक केली असून, त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क

जुने शहरातील शिव नगर येथील प्रभू ज्वेलर्सच्या नावाखाली सत्यनारायण ऊर्फ संजय राधेश्याम अनासने व विजय ऊर्फ शिवनारायण राधेश्याम अनासने यांनी अधिक व्याजदराचे आमिष देऊन शहरातील ३९ नागरिकांकडून तब्बल ४0 लाख रुपयांची रक्कम गोळा केली. पैसे घेताना त्यांनी प्रभू ज्वेलर्सच्या पावत्या देऊन हा व्यवहार केला. या ३९ नागरिकांच्या ४0 लाख रकमेची व्याजासह परतफेड करण्याचा कालावधी जवळ आल्यानंतर या दोघांनी पैसे देण्यास नकार दिला. या दोघांनी ३३ लाख ४७ हजार रुपयांची उचल नागरिकांकडून केली आहे. दरम्यान, त्याच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर तक्रारदारांची संख्या वाढत असून, ही संख्या ३९ जणांवर पोहोचली असून, हा आकडाही ३९ लाख ८७ हजार रुपये झाला आहे. यामध्ये छाया विजय ऐललकार (रा. डाबकी रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सत्यनारायण ऊर्फ संजय राधेश्याम अनासने, राधेश्याम माधवसा अनासने, शिवनारायण ऊर्फ विजय राधेश्याम अनासने सर्व राहणार सागर अपार्टमेंट, कौलखेड व आप्पाजी तडोकार (रा. नावाथे प्लॉट, अमरावती) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सराफा व्यावसायिकांनी दिलेल्या पावत्या बनावट असून, त्या पावत्यांच्या आधारे पैसे घेऊन ते उपयोगातही त्याने आणले असल्याचे तपासात उघड झाले आहे.
सध्या पोलिसांनी यामध्ये विजय अनासने व त्याचा भाऊ या दोघांना अटक केली आहे. त्यात न्यायालयाने विजय अनासने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.