हाणामारी प्रकरणात दोघांना पोलीस कोठडी
By Admin | Published: September 6, 2016 02:25 AM2016-09-06T02:25:35+5:302016-09-06T02:25:35+5:30
दोघांना सोमवारी चार दिवसांची पोलीस कोठडी तर सहा जणांची जामिनावर सुटका केली.
अकोला, दि. ५ : लहान मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या हाणामारीमुळे शनिवारी भीमनगरात झालेल्या हाणामारी प्रकरणातील आठ आरोपींना डाबकी रोड पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने दोघांना सोमवारी चार दिवसांची पोलीस कोठडी तर सहा जणांची जामिनावर सुटका केली. कॅरमच्या गोटीवरून झालेल्या वादाचे पडसाद आठ दिवसानंतर भीमनगर चौकात उमटले. उषा इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीत सुमित अशोक सिरसाट, मॅडी उर्फ रुषील धरम सिरसाट, आकाश देवराव सिरसाट, सागर खाडे, विजू (पेंटर) क्षीरसागर, पुनीत सुखराम क्षीरसागर, सागर अशोक सिरसाट, बंटी धरम सिरसाट, जितू सिरसाट, बंटी मोहोड, साहेबराव सिरसाट सर्व राहणार भीमनगर चौक यांच्यावर गुन्हे दाखल केले. तर छाया अशोक सिरसाट (४0) यांनी दिलेल्या फिर्यादीत एकनाथ इंगळे, लल्ल्या इंगळे, भद्दय़ा ऊर्फ संतोष वानखडे, सोनू इंगळे, राहुल इंगळे, विशाल इंगळे, संदीप इंगळे यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. डाबकी रोड पोलिसांनी माधव मधुकर अंभोरे (२४), अमोल संजय इंगळे (१९), राहुल संतोष इंगळे (२२), विशाल श्रावण इंगळे (२२) व आतिष ऊर्फ विजय इंगळे (२२) यांच्यासह अमोल मोहड आणि विजय क्षीरसागर यांना अटक केली होती. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता अमोल मोहड व विजय क्षीरसागर यांना चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. तर इतर सहा जणांचा जामीन मंजूर केला. यातील कुख्यात गुंड अजूनही फरार आहेत.