पोलीस डॉग लुसीने पुन्हा केला दोन गांजा विक्रेत्यांचा पर्दाफाश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:20 AM2021-05-27T04:20:11+5:302021-05-27T04:20:11+5:30

हरिहर पेठेतील गाडगेनगर येथील रहिवासी दीपक भगवान पराते वय ३९ वर्षे हा त्याच्या घरांमधून गांजा विक्री करीत असल्याची माहिती ...

Police Dog Lucy exposes two cannabis sellers again! | पोलीस डॉग लुसीने पुन्हा केला दोन गांजा विक्रेत्यांचा पर्दाफाश!

पोलीस डॉग लुसीने पुन्हा केला दोन गांजा विक्रेत्यांचा पर्दाफाश!

googlenewsNext

हरिहर पेठेतील गाडगेनगर येथील रहिवासी दीपक भगवान पराते वय ३९ वर्षे हा त्याच्या घरांमधून गांजा विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीवरून स्निफर डॉग लुसीच्या साहाय्याने घरझडती घेतली असता सुमारे ६४० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दीपक पराते याच्याविरुद्ध जुने शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुल्लनी चौकातीळ हाफिजउल्ला खान किफायातउल्ला खान वय ६८ वर्षे हा घरातून गांजाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेच मुल्लनी चौकातील या घरात छापा टाकून डॉग लुसीमार्फत घरझडती घेतली असता ७३७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पदमने, दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, संदीप काटकर, स्वप्नील खेळकर, स्वप्ना काशीद व पोलिस दलाच्या श्वानपथकातील महेंद्र मडावी, गोपाल चव्हाण तसेच स्निफर डॉग लुसी यांनी केली.

फोटो:

शहरात प्रथमच प्रयोग

पोलीस डॉग लुसीमार्फत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचा प्रयोग अकोला पोलिसांनी प्रथमच सुरू केला आहे. यापूर्वी पोलिस माहितीवरून छापेमारी करून अमली पदार्थ जप्त करीत होते. मात्र बरेच वेळा त्यांची ही कारवाई फसत असल्याने खाली हात परतावे लागत होते; मात्र पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी डॉग लुसीमार्फत अशा कारवाया सुरू केल्याने पोलिसांना यश येत आहे.

Web Title: Police Dog Lucy exposes two cannabis sellers again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.