चिमुकलीची हत्या करणार्या आरोपींपर्यंंंत पोहोचण्यात पोलिसांना अपयश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 01:04 AM2017-09-13T01:04:54+5:302017-09-13T01:04:54+5:30
अकोला : नायगाव परिसरातील पाच वर्षीय आलिया परवीन शेख फिरोज हिच्या निर्घृण हत्येची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली होती. तिच्यावर अत्याचार करून आरो पींनी तिची हत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी दोन दिवस उलटूनही अकोट फैल पोलीस आरोपींपर्यंंंत पाहोचण्यात अपयशी ठरत आहेत. मंगळवारी दुपारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि पोलिसांना तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क

नायगाव परिसरात राहणारी आलिया परवीन ही चिमुकली शुक्रवारी सायंकाळी खेळण्यासाठी बाहेर पडली; परंतु बराच वेळ झाल्यानंतरही ती घरी परतली नाही. रात्री उशिरा तिचा शोध घेतल्यानंतरही ती मिळून आली नाही. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी अकोट फैल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी केवळ डायरीमध्ये आलिया बेपत्ता झाल्याची नोंद घेतली; परंतु आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला नाही. रविवारी दुपारी आलियाचा मृतदेह एका पोत्यामध्ये नग्नावस्थेत व कुजलेला असल्याचे दिसून आले.
चिमुकल्या आलियावर अज्ञात आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्यानंतर आपल्या कृतीचे बिंग फुटू नये, या उद्देशाने तिची क्रूरपणे हत्या केली आणि मृतदेह पोत्यामध्ये टाकून फेकून दिला. पोलिसांनी वेळीच घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, तर वेळीच आरो पींच्या मुसक्या आवळता आल्या असत्या, असे आलियाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे; परंतु पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करून केवळ नोंद करून सोपस्कार पूर्ण केले. पोलीस दररोज परिसरातील संशयितांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी करीत आहेत; परंतु त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. आरोपींना शोधण्यासाठी अकोट फैल पोलिसांचा तपास सुरू आहे. मंगळवारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे आदींनी नायगाव येथील घटनास्थळाला भेट दिली आणि पाहणी केली. यावेळी परिसरातील काही नागरिकांसोबतच चर्चासुद्धा केली.
पोलीस अधीक्षकांनी आरोपींना अटक करण्याच्या दृष्टीने अकोट फैल पोलिसांनी आवश्यक सूचनासुद्धा केल्या.
अजूनपर्यंंंत आरोपी मिळाले नाहीत. तपास योग्य दिशेने सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आरोपींना अटक करू.
- तिरुपती राणे, ठाणेदार,
अकोट फैल पोलीस स्टेशन.