पोलीस दलात बदल्या: काळे, नागरे यांच्यासह सात ‘पीएसआय’ला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 02:32 PM2018-06-01T14:32:21+5:302018-06-01T14:32:21+5:30

अकोला: अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे यांनी गुरुवारी परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या, तर काही अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली.

Police force transfers: Seven PSIs including Kale, Nagare, extended the extension | पोलीस दलात बदल्या: काळे, नागरे यांच्यासह सात ‘पीएसआय’ला मुदतवाढ

पोलीस दलात बदल्या: काळे, नागरे यांच्यासह सात ‘पीएसआय’ला मुदतवाढ

Next
ठळक मुद्देअमरावतीवरून पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांची अकोल्यात बदली झाली आहे. बाहेरगावाहून तीन सहायक पोलीस निरीक्षक व पाच पोलीस उपनिरीक्षक अकोल्यात बदलीवर येणार आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे यांनी बदल्या व मुदतवाढीची गुरुवारी दुपारी यादी जाहीर केली.

अकोला: अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे यांनी गुरुवारी परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या, तर काही अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली. मुदतवाढ मिळालेल्या अधिकाºयांमध्ये पोलीस निरीक्षक कैलास नागरे, प्रमोद काळे, एपीआय किशोर शेळके, नंदकिशोर नागलकर यांच्यासह सात पीएसआयचा समावेश आहे. अमरावतीवरून पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांची अकोल्यात बदली झाली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे यांनी बदल्या व मुदतवाढीची गुरुवारी दुपारी यादी जाहीर केली. या यादीत बदल्या करण्यात आलेल्या अधिकाºयांमध्ये एपीआय पांडुरंग फाडे, सचिन जाधव यांची अमरावती ग्रामीण, आशिष इंगळे यवतमाळ, पीएसआय संतोष केदासे यवतमाळ, पीएसआय नितीन बलीगवार, यवतमाळ, संजय कोरचे वाशिम, शरद भस्मे अमरावती ग्रामीण, राजेश साठवणे अमरावती, अशोक सूर्यवंशी बुलडाणा, आशिष बेतल यवतमाळ यांचा समावेश आहे. एक वर्ष मुदतवाढ दिलेल्या पोलीस उपनिरीक्षकांमध्ये पीएसआय दिलीप पोटभरे, संगीता रंधे, श्रीनिवास राठोड, जयसिंग पाटील, चंद्रकांत ममताबादे, प्रकाश कटाळे यांचा समावेश आहे. पीएसआय जयबिरसिंग कुंडवाल यांना सेवानिवृत्त होईपर्यंत मुदतवाढ दिली आहे. बाहेरगावाहून तीन सहायक पोलीस निरीक्षक व पाच पोलीस उपनिरीक्षक अकोल्यात बदलीवर येणार आहेत. यात एपीआय प्रशांत संदे बुलडाणा, दिलीप मसराम यवतमाळ, संजय गवई वाशिम, पीएसआय ज्ञानेश्वर थोरात बुलडाणा, विलास दुतंडे बुलडाणा, सुधाकर गवारगुरू बुलडाणा, सुकेशिनी जमधाडे वाशिम, कैलास इंगळे वाशिम यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Police force transfers: Seven PSIs including Kale, Nagare, extended the extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.