अकोलेकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची १४ तासांपेक्षा अधिक डयुटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 10:53 AM2020-04-05T10:53:11+5:302020-04-05T10:53:17+5:30
अकोला पोलिसांच्या दैनंदीनीचा आढावा लोकमतने घेतला असता त्यांचे कर्तव्य तब्बल १४ तासांपेक्षा अधिक होत असल्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकमतला दिलेल्या माहितीवरुन समोर आले आहे.
- सचिन राऊत
अकोला : कोरोना या संसर्गजन्य विषानुला रोखण्यासाठी केंद्राने केलेले लॉकडाउन आणि राज्य शासनाने लावलेल्या संचारबंदीची अंमलबजावणी करण्याची सर्वात मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. दिवस रात्र रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या अकोलापोलिसांच्या दैनंदीनीचा आढावा लोकमतने घेतला असता त्यांचे कर्तव्य तब्बल १४ तासांपेक्षा अधिक होत असल्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकमतला दिलेल्या माहितीवरुन समोर आले आहे.
अकोला पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाºयांची डयुटी व दैनंदीनी कशा प्रकारे आहे. याचा आढावा घेतला असता अधिकारी आणि कर्मचारी सकाळी सहा वाजता पोलिस ठाण्यात उपस्थित होतात. हजेरी लावल्यानंतर अधिकारी व कर्मचाºयांचे राष्ट्रगीत आणि गीनती होउन त्यांना दिलेल्या पॉइंटवर ६ वाजुन ३० मीनीटापर्यंत हजर व्हावे लागते. या वेळेपासून अधिकारी ह गस्तीवर असतात तर कर्मचारी रात्री १० वाजेपर्यंत त्याच ठिकाणवर प्रामाणिकपणे डयुटी बजावतात. या दरम्यान दोन वेळ चहा, नाष्टा आणि दोन वेळचे जेवन त्यांना जागेवरच देण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अमोघ गावकर या सर्व परिस्थीतीची पाहणी करतात. अधिकारी व कर्मचाºयांना जेवन तसेच नाष्टा वेळेत देण्यात येतो की नाही यासह डयुटी कशा प्रकारे सुरु आहे यावर पोलीस अधीक्षकांचे नियंत्रण असते. मात्र सकाळी ६ वाजेपासून कर्तव्यावर हजर असलेल्या आणि रात्री १० वाजेपर्यंत चोखपने डयुटी बजावणाºया या अधिकारी व कर्मचाºयांना कायदा पायदळी तुडविणाºया अकोलेकरांसोबत तुतु मैमै करावे लागत असल्याचे वास्तव आहे. कोणतेही कारण नसतांना खोटे कारण देउन या पालिसांच्या समोरुन दुचाकी व आॅटोसह कारचालक दिवसभर फीरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास येत आहे. मात्र या बडयांना रोखण्यासाठी पोलिसांनाही अडचणी येत असल्याचे त्यांनी लोकमतकडे बोलून दाखवले. काही कार सोडण्यासाठी तर चक्क दोन आमदारांनी हस्तक्षेप केल्याचे पोलिसांनी सांगीतले. यावरुन अकोलेकरांच्या सुरक्षेसाठी १४ तासांपेक्षा अधिक वेळ कर्तव्य बजावणाºया या पोलिस अधिकारी व कर्मचाºयांप्रती अकोलेकरांना मात्र काहीही देणे नसल्याचे वास्तव आहे.
पोलिसांनाही कुटुंबीय आहेत, जरा विचार करा
दिवस-रात्र रोडवर कर्तव्य बजावणाºया पोलिस अधिकारी व कर्मचाºयांचा शेकडो नागरिकांशी संपर्क येत आहे. अशातच आता वाशिम आणि बुलडाणा येथे कोरोना पॉझीटीव्ह आढळल्याने अकोल्यातही धोका वाढला आहे. त्यामुळे दिवसभर रोडवर डयुटी दिल्यानंतर रात्री कुटुंबीयांसोबत राहणेही त्यांना धोकादायक आहे. मात्र तरीही हे पोलिस बांधव निष्ठेने डयुटी बजावत असतांना अकोलेकर मात्र या गंभीर समस्येला मस्करीने घेत सर्वानाच धोक्यात घालुन पोलिसांच्या कुटुंबीयांवरही अन्याय करीत असल्याचे ते बोलत आहेत.
घरी परतणे मनाला जड जाते
एका पोलिस कर्मचाºयाने दिलेली माहिती धक्कादायक आहे. त्यांची आई आजारी आहे तर त्यांना सहा महिन्यांची एक मुलगी आहे. दोन खोल्यात त्यांचा हा भाडयाचा संसार सुरु असतांना ते दिवसभर डयुटी बजावल्यानंतर रात्री घरी जाणे त्यांच्या मनाला जड जाते. दिवसभर शेकडो जनांच्या संपर्कात आल्यानंतर घरी परतणे म्हणजे कुटुंबीयांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. सहा महिन्याच्या मुलीला ते जवळ घेत नाहीत तर आईसोबत दुरुनच बोलतात. एवढे असले तरीही ते कोेरोनापासून वाचण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतात. मात्र अकोलेकरांनीही विनाकारण बाहेर न येता घरातच राहुन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
वाहतुक कर्मचाºयांवर ताण अधिक
वाहतुक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी सकाळी ६ वाजता आल्यानंतर जिवनावश्यक वस्तूचे जड वाहने शहरात आणणे आणि त्यानंतर जनता भाजी बाजार येथे डयुटी करणे. हे आटोपल्यानंतर दिवसभर विनाकारण फीरणाºया वाहनचालकांवर कारवाई करून सायंकाळी पुन्हा जनता भाजी बाजार येथे डयुटी बजावण्याचे कार्य वाहतुक पोलिसांना दिले आहे. त्यानंतर पुन्हा रात्री उशीरापर्यंत रस्त्यावर फीरणाºया वाहनांवर कारवाई करण्याचे कामकाज वाहतुक पोलिसांचे आहे.