पोलीस पाटलासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:21 AM2021-09-21T04:21:23+5:302021-09-21T04:21:23+5:30
खेट्री : पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत निमखेड येथील पोलीस पाटलासह तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार दि. १९ सप्टेंबर रोजीच्या ...
खेट्री : पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत निमखेड येथील पोलीस पाटलासह तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार दि. १९ सप्टेंबर रोजीच्या रात्री चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रात्रीच पोलीस पाटलासह दोघांना अटक करण्यात आली आहे.
निमखेड येथील गणेश सिद्धार्थ हतोले दि. १९ सप्टेंबर रोजी शेतातून घरी परतल्यानंतर गावातील पोलीस पाटील संतोष डिगांबर ओकटे, त्यांचे वडील डिगांबर ओकटे, आणि त्यांचा भाऊ नंदकिशोर डिगांबर ओकटे या तिघांनी संगनमताने जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली. गणेश सिद्धार्थ हातोले यांनी रविवारी दि. १९ सप्टेंबर रोजीच्या रात्री चान्नी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. यावरून चान्नी पोलिसांनी आरोपी पोलीस पाटील संतोष डिगांबर ओकटे, भाऊ नंदकिशोर डिगांबर ओकटे, आणि वडील डिगांबर ओकटे असे तिघांविरुद्ध रविवारी रात्री ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला. चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश नावकार बाळकृष्ण येवले, प्रवीण सोनोने, लकी ढोके, यांनी रात्रीच पोलीस पाटील संतोष ओकटे, व त्यांचा भाऊ नंदकिशोर ओकटे या दोघांना अटक केली आहे.