ठाणेदार, एपीआय, पीएसआयच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 04:56 PM2018-06-30T16:56:04+5:302018-06-30T16:58:11+5:30

अकोला: पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी गुरुवारी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहर व जिल्ह्यातील ठाणेदारांसह सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षकांच्या जिल्ह्यात व शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये बदल्या केल्या आहेत.

police inspector, API, PSI transfers under the district! | ठाणेदार, एपीआय, पीएसआयच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या!

ठाणेदार, एपीआय, पीएसआयच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या!

googlenewsNext
ठळक मुद्देदोन ठाणेदारांसह शहरातील तीन ठाणेदार, तीन एपीआय आणि १९ पोलीस उप-निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. वैभव पाटील यांची बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत वाडेगावला प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.या बदल्यांमुळे काही ठाणेदार नाराज झाले आहेत तर काही एपीआय, पीएसआय बदल्यांमुळे खुश झाले आहेत.

  
अकोला: पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी गुरुवारी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहर व जिल्ह्यातील ठाणेदारांसह सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षकांच्या जिल्ह्यात व शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये बदल्या केल्या आहेत. विशेष म्हणजे, कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे यांची जिल्हा विशेष शाखेत, सिव्हिल लाइनचे ठाणेदार अन्वर शेख यांची जुने शहरला, विलास पाटील यांची कोतवाली पोलीस ठाण्यात बदली केली. या बदल्यांमुळे काही ठाणेदार नाराज झाले आहेत तर काही एपीआय, पीएसआय बदल्यांमुळे खुश झाले आहेत.
पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील दोन ठाणेदारांसह शहरातील तीन ठाणेदार, तीन एपीआय आणि १९ पोलीस उप-निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यात कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे यांची कोतवालीतून जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली. अन्वर शेख यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यातून जुने शहर पोलीस ठाण्यात, हिवरखेडचे ठाणेदार एपीआय सोमनाथ पवार यांची हिवरखेडला, जुने शहरचे ठाणेदार सतीश पाटील यांची उरळ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक वसंत मोरे यांची महत्त्वाच्या सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी वर्णी लागली आहे. पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्याकडे वाहतूक नियंत्रण शाखेच्या अतिरिक्त प्रभारासह कोतवाली ठाणेदार पदाचीसुद्धा जबाबदारी देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची दहीहांड्याचे ठाणेदार म्हणून, हिवरखेडचे ठाणेदार विकास देवरे यांची तेल्हारा ठाणेदारपदी, पोलीस निरीक्षक विजय मगर यांची बोरगाव मंजू ठाणेदार पदावर बदली करण्यात आली. नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक दिगंबर नागे यांची पोलीस कल्याण शाखेत बदली करण्यात आली. यासोबतच सहायक पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांची दहीहांडा ठाणेदार पदावरून खदान पोलीस स्टेशनला, सीमा दाताळकर यांची विशेष शाखेतून सायबर सेल, दहशतवाद विरोधी कक्षात बदली करण्यात आली. वैभव पाटील यांची बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत वाडेगावला प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. (प्रतिनिधी)


१९ पोलीस उप-निरीक्षकांच्याही बदल्या
पीएसआय अमित डहारे यांची कोतवालीतून सिव्हिल लाइनमध्ये, युवराज उईके यांची बोरगावहून पातूरला. शरद माळी यांची अकोट शहरातून हिवरखेडला, सुवर्णा गोसावी यांची सिव्हिल लाइनमधून अकोट फैलला, राजू गायकी यांची खदानमधून मूर्तिजापूर शहरात, संतोष आघाव यांची सिव्हिल लाइनमधून रामदासपेठला, विजय महाले यांची पातूर येथून अकोट शहरला बदली करण्यात आली. तसेच नीलेश देशमुख यांची बाळापूर येथून तेल्हारा, दिलीप गवई यांची अकोट फैल येथून बोरगाव मंजूला, किशोर मावस्कर यांची डाबकी रोडवरून उरळ, शैलेश मस्के यांची रामदासपेठमधून कोतवालीला, जनार्दन खंडेराव यांची मूर्तिजापूर शहरातून अकोट फैल, दिलीप पोटभरे जुने शहर, राजेश जोशी, अब्दुल मतीन मूर्तिजापूर शहरला, शांतीलाल भिलावेकर दहीहांडा, सागर फेरण, बोरगाव, अनिता इंगळे, सिव्हिल लाइनला बदली करण्यात आली.

 

Web Title: police inspector, API, PSI transfers under the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.