शहरातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या!
By admin | Published: April 21, 2017 01:54 AM2017-04-21T01:54:17+5:302017-04-21T01:54:17+5:30
विलास पाटील, सपकाळ अकोल्यात: शंकर शेळके अकोला एसीबीचे प्रमुख
अकोला : पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उत्तमराव जाधव, रामदासपेठचे ठाणेदार प्रकाश सावकार, जुने शहरचे ठाणेदार रियाज शेख, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध आढाव, ज्ञानेश्वर जाधव यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. बुलडाणा एसीबीचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, नागपुर ग्रामीणमधुन शैलेष सपकाळ यांचीही यांची अकोल्यात बदली झाली आहे. अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील शंकर शेळके यांची अकोला एसीबीला बदली करण्यात आली आहे.
पोलीस विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांच्या आदेशानुसार राज्यभरातील पोलीस निरीक्षकांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदल्यांची यादीच गुरुवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये अकोल्यातीलही पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा समावेश आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांची अमरावती शहरात बदली झाली आहे. रामदासपेठचे ठाणेदार प्रकाश सावकार यांची नाशिक ग्रामीणला बदली झाली. पातूरला ठाणेदार राहिलेले अनिरुद्ध आढाव यांची वर्धा येथे, ज्ञानेश्वर जाधव यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे बदली करण्यात आली. जुने शहरचे ठाणेदार रियाज शेख यांची महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे बदली झाली. पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला येथील दत्तात्रय आव्हाळे यांची अकोला शहरात, सुनील हुड यांची बुलडाणा येथे दिगंबर भदाणे यांची महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे, तर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची अकोला एसीबीला बदली झाली आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक यू. एम. चंदेल यांची हिंगोली येथे, तर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांची अकोला शहरात बदली झाली.
सहा नवीन पोलीस निरीक्षक येणार!
शहरात सहा नवीन पोलीस निरीक्षक येणार असून, यात राज्य गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, अमरावती येथील गणेश अणे, बुलडाणा येथील अशोक कंकाळे, रागुविमधून सुनील सोळके यांच्यासह बुलडाणा एसीबीतून विलास पाटील यांची अकोल्यात बदली झाली आहे. या सहा पोलीस निरीक्षकांपैकी विलास पाटील, शैलेश सपकाळ यांना अकोला शहर परिचित आहे. विलास पाटील यापूर्वी कोतवालीसह रामदासपेठ पोलीस ठाण्यामध्ये ठाणेदार म्हणून कार्यरत होते.सपकाळ हे खदान पोलीस ठाण्यात कार्यरत होते.