खेट्री येथील पोलीस पाटलासह दोघांचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:25 AM2021-09-10T04:25:49+5:302021-09-10T04:25:49+5:30
खेट्री येथे शेतीच्या वादातून दोन गटांत शस्त्र, लोखंडी पाईप व काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २४ जून रोजी सकाळी ...
खेट्री येथे शेतीच्या वादातून दोन गटांत शस्त्र, लोखंडी पाईप व काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २४ जून रोजी सकाळी घडली होती. या हाणामारीमध्ये एका गटातील एकजण गंभीर, तर दुसऱ्या गटातील दोनजण जखमी झाले होते. दोन्ही गटांच्या परस्पर तक्रारीवरून दोन्ही गटांतील ११ आरोपींविरुद्ध चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात एका गटातील पोलीस पाटलासह सहा आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु, जिल्हा व सत्र न्यायालयाने ११ ऑगस्ट रोजी पोलीस पाटलासह सहाही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे आरोपी पोलीस पाटील भगवंता प्रल्हाद ताले, गणेश प्रल्हाद ताले यांनी जामिनासाठी नागपूर खंडपीठात धाव घेऊन पाच आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, त्यापैकी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन आरोपींचा जामीन अर्ज मंजूर करून आरोपी पोलीस पाटील भगवंत प्रल्हाद ताले व गणेश प्रल्हाद ताले या दोघांचा ७ सप्टेंबर रोजी नागपूर खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच जामिनावर सुटका झालेल्या दोनजणांना दर रविवारी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याची अट नागपूर न्यायालयाने घातली आहे.