पोलिसांची आरोपींसाठी नव्हे, पाण्यासाठी पायपीट..!

By admin | Published: April 26, 2016 02:02 AM2016-04-26T02:02:46+5:302016-04-26T02:02:46+5:30

हिवरखेड ग्रामपंचायतचा निर्णय: देयक थकल्याने पोलीस स्टेशनचा पुरवठा बंद; कूपनलिका बंद.

Police not for accused, water pipe ..! | पोलिसांची आरोपींसाठी नव्हे, पाण्यासाठी पायपीट..!

पोलिसांची आरोपींसाठी नव्हे, पाण्यासाठी पायपीट..!

Next

हिवरखेड (आकोट): पाण्याचे देयक थकल्याने हिवरखेड पोलीस स्टेशनचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे. त्यामुळे ऐरवी आरोपींच्या शोधात फिरणार्‍या पोलिसांवर आता पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. आकोट उपविभागात संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिवरखेड येथे पोलीस स्टेशन सुरू करण्यात आले. यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी वसाहत बांधण्यात आली. दोन्ही ठिकाणी ग्रामपंचायततर्फे पाणीपुरवठा करण्यात येत होता. २00१ पासून येथील ४२ हजार रुपयांचे पाण्याचे देयक थकले. देयकासाठी पोलीस स्टेशनकडे पाठपुरावाही करण्यात आला; मात्र देयक भरण्यात आले नाही. अखेर ग्रामपंचायतने पाणीपुरवडा खंडित करण्याचा निर्णय घेतला. पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस कल्याण निधी अंतर्गत कूपनलिका तयार करण्यात आली होती; मात्र काही दिवसांपासून कूपनलिकाही बंद आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.

Web Title: Police not for accused, water pipe ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.