चेकपोस्टवर कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 04:33 PM2020-05-26T16:33:42+5:302020-05-26T16:33:57+5:30

पोलीस शिपाई आपले कर्तव्य बजावत असताना अनभोरा येथील आरोपी मनोज अरुणसिंग बैस याने क्षुल्लक कारणावरून त्यांना मारहाण केली.

A police officer working at a check post was beaten by a youth | चेकपोस्टवर कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

चेकपोस्टवर कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

Next

मूर्तिजापूर : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत अनभोरा चेकपोस्टवर बोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई आपले कर्तव्य बजावत असताना अनभोरा येथील आरोपी मनोज अरुणसिंग बैस याने क्षुल्लक कारणावरून त्यांना मारहाण केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना २५ मे रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली.
कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिक ठिकाणी चेकपोस्ट उभारून तालुका बंदी करण्यात आली आहे. अनभोरा चेकपोस्टवर इतर कर्मचाऱ्यांसह बोरगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई नामदेव बाबुलाल केंद्र कर्तव्य बजावित असताना अनभोरा येथील रहिवासी मनोज अरुणसिंग बैस (३२) हा तेथे आला. मला ट्रक कावा मारुन पळाला आहे,तुम्ही त्याला पकडा असे सांगत असताना कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाने तुमच्याकडे ट्रक नंबर असेल तर सांगा किंवा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करा असे सांगितले. त्यावर मनोज याने थेट पोलीस कर्मचाºयास मारहाण करुन अश्लील शिवीगाळ केली. यात सदर कर्मचारी जखमी झाला. मारहाण होत असताना सोबतच्या इतर कर्मचाºयांनी सोडवणूक केली. घटनेची माहिती कळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस शिपाई नामदेव शेंद्रे यांनी रात्री उशिरा नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मनोज बैस विरुद्ध भादंवी३५३, ३३२, २९४, ४२७, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: A police officer working at a check post was beaten by a youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.