पोलीस अधिकार्याच्या मुलाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:47 AM2017-10-24T01:47:16+5:302017-10-24T01:47:57+5:30
अकोला : जठारपेठ चौकात स्कॉर्पिओ गाडीचा धक्का लागल्याने दोन गटातील युवकांमध्ये वाद झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यामध्ये एका पोलीस अधिकार्याच्या मुलाला मारहाण करण्यात आली. सिव्हिल लाइन्स पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले व वाद मिटवण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क

सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांचा मुलगा सोमवारी सायंकाळी जठारपेठ चौकात उभा होता. यावेळी स्कार्पिओ गाडीचा धक्का लागल्यावरून वाहनचालक व पोलीस अधिकारी पुत्रामध्ये वाद झाला. वाद वाढल्याने दोन्ही गटातील युवकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी चौधरी यांच्या मुलाला काही युवकांनी मारहाण केली. या मारहाणीत चौधरी यांच्या मुलाला दुखापत झाली असून, त्याला खासगी रुग्णालयात उ पचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळ ताच सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार अन्वर एम. शेख घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.