पोलीस अधिकाऱ्याची चोरीस गेलेली पिस्तूल अन् काडतुसे सापडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:52 PM2019-07-28T12:52:00+5:302019-07-28T12:56:21+5:30

जुने शहर पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत गीता नगरातील एका मैदानात पिस्तूल आणि जिवंत काडतुसे शनिवारी सापडली.

Police officer's stolen pistol and cartridges find | पोलीस अधिकाऱ्याची चोरीस गेलेली पिस्तूल अन् काडतुसे सापडली!

पोलीस अधिकाऱ्याची चोरीस गेलेली पिस्तूल अन् काडतुसे सापडली!

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस उपनिरीक्षक राजेश जोशी हे गीता नगर येथील आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये राहतात.अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील त्यांची शासकीय पिस्तूल, १० काडतुसे, ६० हजारांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. अखेर पाच दिवसांच्या तपासणीनंतर एका मैदानात पिस्तूल आणि जिवंत काडतुसे सापडली आहेत.


अकोला: मूर्तिजापूर पोलीस ठाण्यातून अकोल्यात बदली झाल्यानंतर जुने शहर पोलीस ठाण्यात रुजू झालेल्या पोलीस उपनिरीक्षक राजेश जोशी यांच्या गीता नगरातील आशीर्वाद अपार्टमेंटमधील घरात अज्ञात चोरट्यांनी पिस्तूल, १० काडतुसे आणि रोख रकमेसह ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्यानंतर जुने शहर पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत गीता नगरातील एका मैदानात पिस्तूल आणि जिवंत काडतुसे शनिवारी सापडली.
राजेश नानाजी जोशी हे जुने शहर पोलीस ठाण्यात रुजू झाले असून, याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांचे घर आहे. शहरात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झालेले राजेश जोशी हे आपल्या कुटुंबीयांसह गीता नगर येथील आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये राहतात. ते २० जुलै रोजी रात्री पत्नी आजारी असताना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील त्यांची शासकीय पिस्तूल, १० काडतुसे, ६० हजारांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलीस अधिकाºयाचीच पिस्तूल चोरी गेल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, जुने शहरचे पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी पोलीस ताफ्यासह धाव घेऊन सर्च मोहीम सुरू केली होती. अखेर पाच दिवसांच्या तपासणीनंतर एका मैदानात पिस्तूल आणि जिवंत काडतुसे सापडली आहेत. या सर्च मोहिमेसाठी ठाणेदार प्रकाश पवार, महेंद्र बहादूरकर, नितीन मगर, सुडकर, ठाकूर यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे पूर्ण कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Police officer's stolen pistol and cartridges find

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.