पाच अट्टल गुन्हेगार तडीपार, लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाेलिस ‘अॅक्शन माेड’वर
By आशीष गावंडे | Published: March 15, 2024 09:08 PM2024-03-15T21:08:33+5:302024-03-15T21:09:00+5:30
पाच गुन्हेगारांवर तडीपारची कारवाइ करीत त्यांना जिल्ह्याबाहेर हुसकावण्याची कारवाइ शुक्रवारी करण्यात आली.
अकोला: लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शहरासह जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांना वठणीवर आणन्यासाठी कारवाइचा सपाटा लावला आहे. पाच गुन्हेगारांवर तडीपारची कारवाइ करीत त्यांना जिल्ह्याबाहेर हुसकावण्याची कारवाइ शुक्रवारी करण्यात आली.
आगामी दिवसात लाेकसभा निवडणूक व त्यानंतर विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी पाेलिस यंत्रणा कामाला लागली आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय वरदहस्त असणारे काही दादा,भाइ समाजात अशांतता निर्माण करतात.तसेच गुन्हेगारी कारवाया करून कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करतात. अशा गावगुंडांचा बंदाेबस्त करण्याचे निर्देश जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पाेलिस यंत्रणेला दिले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे, खंडणी वसूल करणे, समाजात अशांतता पसरवणे अशा गुन्हेगारांना तडीपार केले जात आहे. शुक्रवारी पाच अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाइ करण्यात आली.
यांची जिल्ह्याबाहेर हकालपट्टी
‘एसपी’ बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार उरळ पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील इमाम खान सुजात खान (३८)रा. गायगाव, रामा पाटील उर्फ प्रसाद उर्फ रामा साहेबराव सुलतान (२४)रा. लोहारा ता. बाळापुर, अमोल सुभाष डाबेराव (३१)रा. बेलोरा ता. पातुर, नितीन गजानन आमझरे (३२)रा.आडसुळ ता. तेल्हारा तसेच रुपेश श्रीकृष्ण काळे (३२)रा. वसंत नगर, मुर्तिजापुर अशा एकूण पाच गुन्हेगारांवर तडीपारची कारवाइ करुन जिल्ह्याबाहेर हकालपट्टी करण्यात आली आहे.