प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे योगदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 03:52 PM2018-06-07T15:52:14+5:302018-06-07T15:52:14+5:30
पोलीस कर्मचाºयांनीसुद्धा सव्वा तीन लाख रुपये वर्गणी गोळा केली. या वर्गणीचा धनादेश पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला.
अकोला : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकरी, गरीब व वंचिताना मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन मिशन मोडवर मोहीम राबवित आहे. या मोहिमेकरिता जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आर्थिक योगदान देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्ती, संस्था, शाळा, अधिकारी व कर्मचारी सढळ हाताने मदत करीत आहेत. पोलीस कर्मचाºयांनीसुद्धा सव्वा तीन लाख रुपये वर्गणी गोळा केली. या वर्गणीचा धनादेश पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला.
जिल्ह्यातील पोलीस विभागातील पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ देण्यात येत आहे. बुधवारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सुमारे जिल्ह्यातील २८00 पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांना विमा सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पोलीस कर्मचारी, अधिकाºयांकडून निधी गोळा करण्याचा आदेश दिला होता. जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ देण्यासाठी सुमारे ७ लाख ४२ हजार रुपये भरावे लागणार आहेत. त्यापैकी गोळा झालेल्या सव्वा तीन लाख रुपयांचा धनादेश बुधवारी देण्यात आला. उर्वरित रक्कम जिल्हा प्रशासन भरणार आहे. शेतकरी, गरीब, वंचितांचा विमा व एफडीसाठी प्रशासन प्रत्येकाच्या नावे रु. २३२ गुंतविणार आहे. ही रक्कम वर्षानुवर्षे शेतकºयांच्या नावे बँकेत राहील. सामाजिक जबाबदारी म्हणून सामाजिक संघटना, प्रतिष्ठित नागरिकांनी शेतकºयांना दत्तक घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी विजयसिंह मोहिते उपस्थित होते.