बाळासाहेब आंबेडकरांना पोलीस संरक्षण द्या; देवळी ग्रामपंचायतने घेतला एकमताने ठराव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 02:32 AM2018-01-13T02:32:44+5:302018-01-13T02:34:01+5:30
अकोला : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे बहुजनांच्या कल्याणासाठी भारतभर फिरून रात्रंदिवस झटत असतात. ते बहुजनांच्या हितासाठी आंदोलने करतात. बहुजनविरोधी समाजकंटकांकडून त्यांच्या जीवास धोका होऊ शकतो. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने त्यांना पोलीस संरक्षण द्यावे, असा ऐतिहासिक ठराव अकोला तालुक्यातील देवळी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी १२ जानेवारी रोजी ग्रामपंचायतच्या आयोजित सभेत एकमताने पारित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क

देवळीच्या उपसरपंच वैशाली विकास सदांशिव यांनी या ठरावाची सूचना मांडली. ग्रामपंचायत सदस्य देवानंद सदांशिव यांनी अनुमोदन दिले.
सरपंचासह ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी हा ठराव एकमताने पारित केला. या ठरावाच्या सुचक असलेल्या ग्रामपंचायतच्या उपसरपंच वैशाली विकास सदांशिव या भारिप-बमसं पक्षाचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष विकास सदांशिव यांच्या पत्नी आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांच्याप्रती श्रद्धा ठेवून केंद्र व राज्य सरकारने त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करणारी देवळी ही राज्यातील कदाचित पहिलीच ग्रामपंचायत असावी.
कोरेगाव भीमा प्रकरण बाळासाहेब आंबेडकर यांनी अतिशय आक्रमकपणे लावून धरले. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची काळजी सर्वांनाच आहे.
त्यानुसार हा ठराव घेतला आहे. या ठरावानुसार केंद्र व राज्य शासन बाळासाहेब आंबेडकरांना पोलीस संरक्षण देणार का, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.