गीता नगरातील सट्ट्यावर पोलिसांचा छापा; तीन युवक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 16:05 IST2020-10-18T16:05:07+5:302020-10-18T16:05:18+5:30
Cricket Beating युवकांकडून रोख रकमेसह मोबाइल व ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गीता नगरातील सट्ट्यावर पोलिसांचा छापा; तीन युवक ताब्यात
अकोला : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) दरम्यान शनिवारी रात्री दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यादरम्यान गीता नगरमध्ये तीन युवक मोठ्या प्रमाणात सट्टा बाजार चालवित असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकून तीनही युवकांना ताब्यात घेतले. या युवकांकडून रोख रकमेसह मोबाइल व ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गीता नगरमध्ये हर्षद चाळसे रा. गीता नगर, शिवा थेटे रा. हरिहर पेठ व प्रयाग मिरजामले रा. रजपूतपुरा हे तिघे आयपीएलच्या सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्ट्याची देवाण-घेवाण करीत असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाचे प्रमुख अमित डहारे यांना मिळाली. त्यांनी पथकासह छापा टाकून या तिघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडून मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही, पेन व वही यासह ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या तीनही आरोपींविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.