तेल्हा-यात पोलिसांची जुगारावर धाड
By admin | Published: March 6, 2017 02:08 AM2017-03-06T02:08:48+5:302017-03-06T02:08:48+5:30
आठ आरोपींना अटक; जि.प. शिक्षकाचा समावेश.
तेल्हारा, दि. ५- तेल्हारा शेतशिवारात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ५ मार्च रोजी दोन ठिकाणी जुगार अड्डय़ावर धाड टाकून आठ आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून दुचाकी व मोबाइलसह १ लाख ३७ हजार ५७0 रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाने केली.
तेल्हारा शहरात राजरोस अवैध जुगार मटका चालत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. या पथकाने ५ मार्चच्या दुपारी संजय आसरे यांच्या शेतात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून टाकली. यामध्ये अब्दुला खॉ मुस्तफा खॉ, उल्हास विश्वनाथ पुंडकर, मुकेश ताथोड यांना रंगेहात पकडून त्यांच्याजवळून मोबाइल व नगदी, असा एकूण ४ हजार ६७0 मुद्देमाल जप्त केला. दुसरी धाड ही गोपाल चहाजगुणे यांच्या शेतामध्ये सुरू असलेल्या जुगारावर टाकून यामध्ये शेख महेबूब शेख रहेमान, तेल्हारा, उद्धवराव कौतिकराव देशमुख तेल्हारा, घनश्याम लालचंद राठी, प्रमोद सुखदेव तायडे, गाडेगाव, गोपाल गजानन चहाजगुणे, तेल्हारा यांना रंगेहात पकडून यामध्ये मोटारसायकल, मोबाइल नगदी असा १ लाख ३२ हजार ९00 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना तेल्हारा पोलिसांच्या सुपुर्द करण्यात आले. या विशेष पथकात ए.पी.आय. हर्षराज अळसपुरे, आनंद प्यारेवाले, अनिल भुसारी, ज्ञानेश्वर पायधन, शिवानंद गावंडे, स्वप्निल वानखडे, संतोष भुसनर, संदीप खोकले, मयूर वीसपुते, नीलेश देशमुख, सुरेश म्हैसने यांचा समावेश होता.