पोलिसांनी पुन्हा राबविले ‘आॅपरेशन आॅल आउट’

By admin | Published: April 10, 2017 12:51 AM2017-04-10T00:51:07+5:302017-04-10T00:51:07+5:30

अकोला- शनिवारी रात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत अकोला पोलिसांकडून शहरात पुन्हा एकदा आॅपरेशन आॅल आउट राबविण्यात आले.

Police re-implemented 'Operation handle' | पोलिसांनी पुन्हा राबविले ‘आॅपरेशन आॅल आउट’

पोलिसांनी पुन्हा राबविले ‘आॅपरेशन आॅल आउट’

Next

अकोला : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या आदेशानुसार, शनिवारी रात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत अकोला पोलिसांकडून शहरात पुन्हा एकदा आॅपरेशन आॅल आउट राबविण्यात आले. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्यासह १७ पोलीस अधिकारी आणि ११९ कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली. आॅपरेशन आॅल आउट या मोहिमेत रात्रभर संशयित दुचाकी आणि चारचाकी असलेल्या ३२१ वाहनांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६१ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून ११ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यासोबतच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत एकूण २३ केसेस करण्यात आल्या आहेत. यामध्ये रात्रीदरम्यान हॉटेल आणि पानटपऱ्यांसह वाईन बार उघडे ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, तसेच रात्रीचे फिरणारे संशयित इसम, निगराणी बदमाश यांच्यावर कारवाई करण्यात आली. फरार असलेल्या आरोपींची तपासणी करण्यात आली असून, वॉरंटची तामिली करण्यात आली आहे.

Web Title: Police re-implemented 'Operation handle'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.