पोलीस पाटलासह सहा आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:21 AM2021-08-15T04:21:12+5:302021-08-15T04:21:12+5:30
खेट्री : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत खेट्री येथे दोन गटात शस्त्र, लोखंडी पाइप व काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाल्याची ...
खेट्री : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत खेट्री येथे दोन गटात शस्त्र, लोखंडी पाइप व काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २४ जून रोजीच्या सकाळी घडली होती. या हाणामारीमध्ये एका गटातील एक जण गंभीर, तर दुसऱ्या गटातील दोन जण जखमी झाले होते. या प्रकरणात एका गटातील पोलीस पाटलासह सहा आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता, परंतु जिल्हा व सत्र न्यायालयाने ११ ऑगस्ट रोजी पोलीस पाटलासह सहाही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
खेट्री येथे दोन्ही गटात गेल्या काही वर्षांपासून शेतीच्या कारणावरून वाद सुरू आहे. दि. २४ जून रोजी वाद उफाळून आला. दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली होती. याप्रकरणी एका गटातील महादेव गोविंदा ताले यांच्या फिर्यादीवरून गणेश प्रल्हाद ताले, पोलीस पाटील भगवंता प्रल्हाद ताले, राहुल भगवंता ताले, महेश भगवंता ताले, सार्थक गणेश ताले, प्रशांत समाधान ताले, असे सहा आरोपी तसेच दुसऱ्या गटातील गणेश प्रल्हाद ताले यांच्या फिर्यादीवरून आरोपी महादेव गोविंदा ताले, बाळू महादेव ताले, विश्वनाथ महादेव ताले, योगेश महादेव ताले, सदाशिव महादेव ताले, असे पाच आरोपी असे दोन्ही गटातील एकूण ११ आरोपींविरुद्ध चान्नी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. एका गटातील पोलीस पाटलासह सहा आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु जिल्हा व सत्र न्यायालयाने ११ ऑगस्ट रोजी पोलीस पाटलासह सहाही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणी पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत.