‘पोलिस ऑन रोड’ योजना राबविणार!
By admin | Published: August 9, 2014 01:56 AM2014-08-09T01:56:28+5:302014-08-09T02:04:43+5:30
अकोल्याचे नवे पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची माहिती.
अकोला: वाढती गुंडगिरी, गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी ह्यपोलिस ऑन रोडह्ण ही योजना राबविण्याचे आपल्या मनात आहे. पोलिस अधिकारी, कर्मचार्यांनी पोलिस ठाण्यांच्या बाहेर काढून, त्यांनी रस्त्यांवर गस्त घालून घडणार्या गुन्हेगारीला, गुंडांना वेसन घालावे. पोलिस ऑन रोड राहिल्याने शहरातील घडणार्या घडमोडींवर त्यांचा वॉच राहील. जनतेमध्येही जाण्याची संधी त्यानिमित्ताने मिळेल, अशी माहिती शुक्रवारी रुजू झालेले नवे पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांसोबत बोलताना दिली. शहर अतिसंवेदनशील आहे. येथे येण्यापूर्वी येथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार शहरामध्ये काही योजना राबविण्याचा आपला मानस असल्याचेही मीणा यांनी सांगितले. लवकरच जिल्हय़ातील सर्व ठाणेदारांची, सहायक पोलिस निरीक्षक, पीएसआय दर्जाच्या अधिकार्यांची बैठक बोलावून घेण्यात येईल. चोरी, घरफोडींवर तोडगा म्हणून काटेकोरपणे पोलिसिंग राबविण्याची योजना आहे. तसेच गुंडगिरी, खंडणीबहाद्दरांना वठणीवर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. शहराची बेताल वाहतूक आपल्या नजरेतून सुटलेली नाही. त्यामुळे बेताल वाहतुकीविषयी काही ठोस निर्णय घेतले जातील. वरिष्ठ अधिकार्यांनी पोलिस कर्मचार्यांना विश्वासात घेतले पाहिजे. पोलिस कर्मचार्यांच्या उत्कृष्ट कामगिरीला अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मीणा म्हणाले. परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, प्रभारी शहर पोलिस अधीक्षक गणेश गावडे उपस्थित होते.