निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पोलिसांनी सतर्क रहावे
By admin | Published: September 26, 2014 01:53 AM2014-09-26T01:53:30+5:302014-09-26T01:53:30+5:30
राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहआयुक्त डॉ. सुखविंदर सिंह यांच्या अकोला जिल्ह्यातील पोलिसांना सुचना
अकोला : होणार्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून काही समाजकंटक सक्रिय होऊ शकतात. तसेच समाजविघातक कृत्ये घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणार्यांविरुद्ध वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई करून आवर घालावा, अशा सूचना राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहआयुक्त डॉ. सुखविंदर सिंह यांनी दिल्या. गुरुवारी डॉ. सिंह अकोल्यात आले होते. त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विश्रामगृहावर गुरुवारी रात्री ७.३0 वाजताच्या सुमारास आढावा बैठक घेतली. बैठकीला पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी नंदकिशोर काळे, गणेश गावडे, प्रदीप चव्हाण, पोलिस निरीक्षक शिरीष सासने उपस्थित होते.