महिलेचा विनयभंग करणारा पोलिस निलंबीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:05 PM2018-09-08T12:05:31+5:302018-09-08T12:08:47+5:30
पोलिस खात्याची प्रतिमा मलीन करणाºया उपाली शिरसाट याला शुक्रवारी रात्री निलंबीत केल्याची माहिती आहे.
अकोला - बाळापूरपोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या उपाली शिरसाट नामक पोलिस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यानजीक एका महिलेचा विनयभंग केला होता. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पोलिस खात्याची प्रतिमा मलीन करणाºया उपाली शिरसाट याला शुक्रवारी रात्री निलंबीत केल्याची माहिती आहे.
उपाली शिरसाट नामक पोलीस कर्मचाºयाने २९ आॅगस्ट रोजी रात्री बाळापूर मधील एका महिलेचा विनयभंग केला होता. या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात कार्यररत असलेल्या शिरसाट याच्याविरुध्द याच पोलिस ठाण्यात महिलेचा विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपाली शिरसाट याच्या कारणाम्यामूळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या गंभीर प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर महिलेच्या विनयभंग प्रकरणात आरोपी असलेल्या पोलीस कर्मचारी उपाली शिरसाट याला निलंबीत करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षकांनी शुक्रवारी केल्याची माहिती आहे.