अवैध शस्त्र निर्मिती कारखान्यावर पोलिसांची कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 11:44 AM2020-10-17T11:44:49+5:302020-10-17T11:47:28+5:30

Illegal arms factory in Akola अब्दुल इमारन याला अटक केली असून, ४१ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Police take action against illegal arms factory | अवैध शस्त्र निर्मिती कारखान्यावर पोलिसांची कारवाई!

अवैध शस्त्र निर्मिती कारखान्यावर पोलिसांची कारवाई!

Next
ठळक मुद्दे४१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अब्दुल इमारन याला अटक केली.

अकोला : गवळीपुरास्थित फिरदोस कॉलनी परिसरातील सुरू असलेल्या तलवार, रामपुरी चाकूच्या अवैध निर्मिती कारखान्यावर शुक्रवारी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अब्दुल इमारन याला अटक केली असून, ४१ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक गुरुवार १५ ऑक्टोबर रोजी गस्तीवर असताना रात्री ९ वाजताच्या सुमारास एपीएमसी मार्केट परिसरात असताना गुवळीपुरा भागातील फिरदोस कॉलनी येथे अब्दुल इमरान हा त्याच्या घरात अवैधरित्या शस्त्र निर्मिती करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी अब्दुल इमरान याच्या घरी कारवाई केली असता, या ठिकाणी एक जण मशीनद्वारे तलवार निर्मिती करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव अब्दुल इमरान अब्दुल लतिफ (२३, रा. फिरदोस काॅलनी, गवळीपुरा, अकोला) असे सांगितले आहे. घटनास्थळावरून पोलिसांना स्टीलच्या तीन तलवारी, लोखंडी पात्याच्या सात तलवारी, एक लोखंडी रामपुरी चाकू, पांढर्‍या धातूचे टोकदार पाते, पृष्ठावर बनलेली तलवारीची डिझाइन, एक प्लास्टिकमधील चाकूची डिझाइन, दोन लाकडी मुठा, मोजमापाची स्टील पट्टी, एक पेन्चीस, दोन लोखंडी हातोड्या, लोखंडी सांडस, जंबुरा, कानस, दोन लोखंडी पोगर, एक छन्नी, एक पाना, दोन चष्मे, दोन लोखंडी हातपकड, एक ग्राइंडर मशीन, एक लोखंडी कटर मशीन, एक ड्रील मशीन, लोखंडी पांढर्‍या धातूची पट्टी, एक स्टील पाइप असे एकूण ४१ हजार ४१० रुपयांचे अवैध शस्त्र व शस्त्र बनविण्यात उपयोगी येणारे साहित्य मिळून आले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ४,२५ आर्म ॲक्टसह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमप्रमाणे पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विशेष पथक मिलिंदकुमार अ. बहाकर व त्यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Police take action against illegal arms factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.