पोलिसांचा ‘वॉक अँण्ड रन’ उपक्रम
By admin | Published: September 1, 2016 02:40 AM2016-09-01T02:40:45+5:302016-09-01T02:40:45+5:30
दररोज सकाळी शहराच्या मध्य भागातून पोलीस प्रशासनाद्वारे ‘वॉक अँण्ड रन’ करण्यात येणार.
अकोला, दि. ३१ : येणार्या काळातील धार्मिक सण, उत्सवांमध्ये गैरकायदेशीर कृत्यांवर नजर राहावी तसेच पोलीस आणि जनतेमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी ह्यवॉक अँण्ड रनह्ण हा उपक्रम पोलिसांनी सुरू केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, दररोज सकाळी शहराच्या मध्य भागातून पोलीस प्रशासनाद्वारे ह्यवॉक अँण्ड रनह्ण करण्यात येणार आहे.
शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये बुधवारी सकाळी राबविण्यात आलेल्या ह्यवॉक अँण्ड रनह्ण उपक्रमात दंगल नियंत्रण पथक, पोलीस मुख्यालयातील महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारी यांच्यासह शहरातील पोलिसांनी सहभाग घेतला होता.
ह्यवॉक अँण्ड रनह्ण हा उपक्रम किल्ला चौकातून सुरू करण्यात आला. त्यानंतर भांडपुरा पोलीस चौकी, गजानन महाराज मंदिर, मोहम्मद प्लॉट, भगतवाडी, गुलजारपुरा, भीम नगर, दगडी पूल, काळा मारोती मंदिर, जयहिंद चौकातून जुने शहर पोलीस स्टेशनपर्यंत ह्यवाक अँण्ड रनह्ण उपक्रम राबविण्यात आला.