पोलीस कल्याण सप्ताहांतर्गत पोलीस कुटुंबीयांचा स्नेहमेळावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 02:42 PM2018-06-04T14:42:51+5:302018-06-04T14:42:51+5:30
पोलीस दलाच्यावतीने रविवारी सकाळी पोलीस मुख्यालयात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा स्नेहमेळावा पार पडला.
अकोला: पोलीस महासंचालकांच्या संकल्पनेतून पोलीस कल्याण योजनांची माहिती देण्यासाठी पोलीस कल्याण जागरूकता सप्ताह राबविण्यात येत आहे. पोलीस दलाच्यावतीने रविवारी सकाळी पोलीस मुख्यालयात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा स्नेहमेळावा पार पडला. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या हस्ते पोलीस कल्याण योजनेची माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केले. यावेळी त्यांच्या पत्नी डॉ. मानसा कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, पोलीस उपअधीक्षक किसन गावीत, पोलीस कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक पी.जे. अब्दागिरे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, डॉ. मानसा कलासागर यांच्या हस्ते पोलीस अधिकारी, कर्मचाºयांच्या पाल्यांनी दहावी व बारावीत उत्कृष्ट यश प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले. पोलीस अधिकारी, कर्मचाºयांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. सोनल मोदी यांनी तपासणी केली.
या गुणवंत पाल्यांचा सत्कार
जुने शहरचे ठाणेदार गजानन पडघन यांचा मुलगा अपूर्व, सहायक पोलीस उपनिरीक्षक ए. व्ही. डिवरे यांची मुलगी रूपल, पोलीस कर्मचाºयांचे पाल्य विवेक विजय खर्चे, युगंधर सुरेश महल्ले, अक्षय सतीश सपकाळ, सृष्टी संजय भटकर, कुणाल श्यामकुमार बुंदेले, सूरज गोपालकृष्ण पवार, तेजस विलास रामेकर, प्रीती संजय इंगळे, मंदार ओंकार मुळे, सुवर्णा देवीदास येऊल, विक्रांत सुभाष बांडे, सौरभ सतीश हाडोळे, ऋषिकेश रविकांत गिरी, नितीन गजानन मानकर, सौरभ गजानन खाडे आदींचा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, डॉ. मानसा कलासागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.