खासदारांच्या वक्तव्याने सामाजिक कार्यक्रमाला राजकीय रंग!
By admin | Published: July 6, 2015 01:32 AM2015-07-06T01:32:56+5:302015-07-06T01:32:56+5:30
धोत्रेंचा टोला कुणाला? ; मारवाडी युवा मंचच्या प्रांतीय अधिवेशनात चर्चेला उधाण.
अकोला : भाजप सरकारमध्ये मारवाडी नेता नसल्याने हे सरकार जास्त काळ चालणार नाही, असे मारवाडी युवा मंचच्या प्रांतिय अधिवेशनात एका पदाधिकार्याने केलेले वक्तव्य आणि त्यानंतर जबाबदारीची जाणीव नसलेल्यांनाही सत्तेची स्वप्नं पडत असल्याचे खासदार संजय धोत्रे यांचे प्रति पादन, यामुळे रविवारी अकोल्यात आयोजित केलेल्या एका सामाजिक कार्यक्रमास राजकीय रंग चढला. संजय धोत्रे यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कुणाच्या दिशेने होता, मारवाडी समाजाच्या, की आणखी कुणाच्या, या प्रश्नावर कार्यक्रमस्थळी चर्चा रंगली होती. महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंचतर्फे रविवारी अकोला येथे प्रांतिय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. अकोला-वाशिमचे पालकमंत्री त था गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्य़ाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष निकेश गुप्ता होते. खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिशन बाजोरिया, अखिल भारतीय मारवाडी युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी अग्रवाल, पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष अनिल जाजोदिया, अग्रसेवा दलाचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, अ.भा. मारवाडी युवा मंचचे माजी अध्यक्ष ओम पाटणी, महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार चौधरी, वीरेंद्रप्रकाश धोका, राष्ट्रवादी काँग्रेचे अकोला शहर अध्यक्ष अजय तापडिया, माजी आमदार बबनराव चौधरी, जयप्रकाश मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती. मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव वीरेंद्रप्रकाश धोका यांनी मार्गदर्शन करताना, ह्यमारवाडी नेता नसेल, तर सध्याचे सरकार चालणार नाहीह्ण असे वक्तव्य केले. त्यानंतर खासदार धोत्रे यांनी भाषण देताना, ह्यज्याला जबाबदारीची जाणीव नाही, त्याला पण सत्तेची स्वप्नं पडत आहेतह्ण, असे वक्तव्य केले. जबाबदारीची कामे सोडून सत्तेत येण्यासाठी खटाटोप केला जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. संजय धोत्रे यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमस् थळी चर्चा रंगली. त्यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कुणाच्या दिशेने होता, यावर उपस्थितांनी अंदाज बांधण्यास सुरूवात केली. काहींनी त्यांच्या वक्तव्याचा रोख मारवाडी समाजाच्या दिशेने असल्याचा अंदाज बांधून नाराजी व्यक्त केली, तर काहींच्या मते त्यांच्या या वक्तव्याशी मारवाडी समाजाचा काहीही संबंध नव्हता. धोत्रेंच्या वक्तव्याचा रोख कुणाच्याही दिशेने असो, एक मात्र नक्की, त्यांच्या वक्तव्याने सामाजिक कार्यक्रमाच्या तंबुचे राजकीय चावडीत रूपांतर झाले होते.