महापालिका आयुक्तांच्या बदलीवरून राजकीय घमासान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 01:59 AM2017-08-14T01:59:37+5:302017-08-14T02:00:02+5:30
अकोला:शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अशी ओळख असणार्या महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या बदलीवरून भाजपाच्या दोन गटांत चांगलेच घमासान रंगल्याचे चित्र आहे. भाजपातील अंतर्गत राजकारणाचे बळी ठरलेल्या आयुक्त लहाने यांच्या बदलीचे आदेश नगरविकास विभागातून जारी न होता महसूल विभागातून निघाल्यामुळे प्रशासकीय वतरुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शहराच्या विकासासाठी आयुक्त अजय लहाने यांच्यासारख्या खमक्या अधिकार्याची गरज असताना त्यांची बदली होणे कितपत योग्य, असा सवाल अकोलेकर उपस्थित करीत आहेत.
आशिष गावंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला:शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अशी ओळख असणार्या महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या बदलीवरून भाजपाच्या दोन गटांत चांगलेच घमासान रंगल्याचे चित्र आहे. भाजपातील अंतर्गत राजकारणाचे बळी ठरलेल्या आयुक्त लहाने यांच्या बदलीचे आदेश नगरविकास विभागातून जारी न होता महसूल विभागातून निघाल्यामुळे प्रशासकीय वतरुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शहराच्या विकासासाठी आयुक्त अजय लहाने यांच्यासारख्या खमक्या अधिकार्याची गरज असताना त्यांची बदली होणे कितपत योग्य, असा सवाल अकोलेकर उपस्थित करीत आहेत.
आज रोजी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता आहे. जिल्ह्याची सूत्रे खासदार संजय धोत्रे यांच्याकडे असून, सलग पाचव्यांदा विजयश्री प्राप्त करणारे आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांचा त्यांच्या मतदारसंघापुरताच नव्हे, तर जिल्ह्यात प्रभाव असल्याचे कोणीही नाकारत नाही. या दोन्ही आमदारांच्या मतदारसंघात महापालिका क्षेत्राचा अंतर्भाव होतो. त्यामुळे साहजिकच शहराच्या विकास कामांसाठी निधी खेचून आणणे आणि त्याद्वारे रखडलेल्या विकास कामांचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी दोन्ही आमदार कमालीचे आग्रही असल्याचे दिसून येते. विकास कोणत्याही क्षेत्राचा-भागाचा असो, त्यासाठी निधी खेचून आणणारे जनप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेचा आपसातील समन्वय मोलाचा ठरतो. सप्टेंबर २00१ मध्ये स्थापना झालेल्या महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारणार्या विविध अधिकार्यांच्या कार्यशैलीबद्दल अकोलेकर चांगलेच परिचित आहेत. मनपाची विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी आयुक्त अजय लहाने यांनी बिंदूनामावली, आकृतिबंधाचा विषय हाती घेतला. थकीत वेतनाची समस्या निकाली काढण्यासाठी उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रित केले. दुसरीकडे प्रशस्त रस्त्यांचे निर्माण व्हावे, यासाठी रस्त्यालगतची धार्मिक स्थळे हटवली. पाणीपुरवठय़ाची कामे निकाली काढण्यासाठी जलवाहिनीचे जाळे टाकले. घरोघरी जाऊन कचरा उचलण्यासाठी १२५ वाहनांची व्यवस्था केली. ही बोटावर मोजता येणारी उदाहरणे असून, आयुक्तांच्या रोखठोक भूमिकेमुळे शहर विकासाची गाडी रुळावर आल्याची वस्तुस्थिती आहे. अशा स्थितीत केवळ पक्षांतर्गत राजकारणातून त्यांची बदली होणे अकोलेकरांना अपेक्षित नाही.
नगरसेवकांची नाराजी कशासाठी?
प्रशासनाच्या आडमुठय़ा धोरणामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे बोलल्या जाते. कारणमीमांसा केली असता कागदोपत्री लाखो रुपयांची कामे दाखवून देयक काढण्याचे प्रकार कधीचेच बंद झाले आहेत. असे प्रकार पुन्हा सुरू करण्यासाठी अनेकांचे हात शिवशिवत आहेत. त्यासाठी आयुक्तांची बदली अत्यावश्यक झाल्याचे चित्र समोर आले आहे.
समन्वयाची भूमिका अंगलट
मनपाची सत्तासूत्रे भाजपाच्या हातामध्ये जाऊन महापौरपदी विजय अग्रवाल विराजमान झाले. महापौर विजय अग्रवाल आणि आयुक्त अजय लहाने यांच्यातील वाढता समन्वय पक्षांतर्गत डोकेदुखी ठरू लागल्याची चर्चा आहे. शिवाय, प्रत्येक ठिकाणी आयुक्तांची चौकस बुद्धी आडवी येत असल्यामुळे त्यांच्या बदलीसाठी भाजपानेच पुढाकार घेतला, हे येथे उल्लेखनीय. यामुळे आगामी दिवसांत मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असा मनपाचा कारभार पारदश्री चालेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.