राजकीय बैठकी हाेतात, मग कीर्तनाला विराेध का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:29 AM2020-12-05T04:29:33+5:302020-12-05T04:29:33+5:30
अकाेला: अनलाॅकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर तब्बल १० महिन्यांनी मंदिरे उघडण्याची परवानगी दिली. या संपूर्ण कालावधीत वारकऱ्यांनी संयम पाळला; मात्र ...
अकाेला: अनलाॅकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर तब्बल १० महिन्यांनी मंदिरे उघडण्याची परवानगी दिली. या संपूर्ण कालावधीत वारकऱ्यांनी संयम पाळला; मात्र आता जवळपास सर्वच क्षेत्र खुले झाले आहेत. राजकीय बैठकांनाही गर्दी हाेत आहे. त्या गर्दीबाबत काेणीही आक्षेप घेत नाही. मग वारकऱ्यांनी भजन-कीर्तनासाठी केवळ शंभर वारकरी एकत्र जमवले तर विराेध का, अशा शब्दात विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी व्यथा व्यक्त केली.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गणेश महाराज शेटे यांच्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही प्रशासनाने व सरकारने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये सरकारविषयी तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे, असे स्पष्ट करून शेटे म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची भूमी असूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांना भजन-कीर्तनाकरिता आमरण उपोषण करावे लागते व आत्मदहनाचा इशारा द्यावा लागावा हा फार मोठा कलंक ठाकरे सरकारमुळे महाराष्ट्राला लागलेला आहे. महाराष्ट्र सरकारला जाग येण्याकरिता आमरण उपोषणामध्ये वारकरी मंडळी काळ्या फिती बांधून आमरण उपोषण करणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी उपोषणामध्ये महिला कीर्तनकार अर्चना निंबोकार, सविता बनतकार, गोदावरी बंड तसेच मनोज महाराज टाले, योगेश महाराज तांबडे यांची कीर्तनाची सेवा पार पडली. उपोषणाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, जिल्हा परिषद सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, जि.प. सभापती पंजाबराव वडाळ, प्रदीप वानखडे, आदींनी भेट दिली व आमरण उपोषणाला साखळी पद्धतीने महादेव महाराज निमकंडे, विठ्ठल महाराज साबळे, राजू महाराज कोकाटे, श्रीकृष्ण महाराज बाबूळकर, विजय महाराज राऊत, गजानन महाराज दहीकर, श्रीधर महाराज तळोकार, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, राम महाराज गवारे, शिवा महाराज बावस्कार, मनोज महाराज टाले, रघुनाथ घुगे, राजू महाराज कोकाटे, सुपेश महाराज पातोडे, किशोर महाराज लळे, वासुदेव महाराज सावरकर, अमोल महाराज बांगर, पुरुषोत्तम महाराज मोरे, पुरुषोत्तम महाराज रौराळे, विक्रम महाराज शेटे, सोपान महाराज उकर्डे, गजानन मोडक यांनी साखळी पद्धतीने अमरण उपोषण केले.