जनता भाजी बाजारच्या मुद्द्यावर राजकारण; आंदाेलन छेडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:58 AM2021-01-08T04:58:38+5:302021-01-08T04:58:38+5:30
जनता भाजी बाजारच्या जागेवर अवैधरीत्या भाजीपाल्याची हर्राशी हाेत असून, ती तातडीने बंद करण्याच्या मागणीसाठी लाेणी रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी ...
जनता भाजी बाजारच्या जागेवर अवैधरीत्या भाजीपाल्याची हर्राशी हाेत असून, ती तातडीने बंद करण्याच्या मागणीसाठी लाेणी रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर साखळी उपाेषण केले. पालकमंत्री बच्चू कडू यांच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी जनता भाजी बाजारात रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत भाजीपाला विक्रीवर बंदी आणली आहे. त्या पार्श्वभूमीवर जनता भाजी बाजारात व्यवसाय करणाऱ्या महात्मा फुले फळ, भाजीपाला अडत दुकान असाेसिएशनने पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. काेराेना संसर्गाच्या निमित्ताने मनपाच्या सूचनेवरून काही व्यावसायिकांनी पातूर राेडलगत व काही व्यावसायिकांनी लाेणी रस्त्यालगत भाजी बाजारचे निर्माण केले आहे. यामध्ये पातूर रस्त्यालगतच्या बाजारात बांधकाम सुरू असून, याठिकाणी मूलभूत सुविधांची पूर्तता नसल्याचे सज्जाद हुसेन यांनी स्पष्ट केले. हा बाजार व्यावसायिकांनी सोडावा यासंदर्भात मनपाचा काेणताही लेखी आदेश नाही. जिल्ह्यातील कास्तकार, अडते, व्यावसायिक, नागरिकांना जनता भाजी बाजार सोयीचा व सुरक्षित वाटताे. येथे कास्तकारांची आर्थिक लूट, मालाची नासधूस, माल कमी भरवणे, अव्वाच्या सव्वा दराने विक्री करणे असे प्रकार हाेत नसल्यामुळे या बाजाराला सर्वांची पसंती आहे. जनता भाजी बाजारातील व्यवसायांची दुकाने वहिवाटीची असून, ती उच्च न्यायालयाच्या न्यायकक्षेत आहेत. उच्च न्यायालयाने प्रशासनास या संदर्भात दुकानदारांचे हित जोपासून योग्य निर्णय घेण्याचा आदेश मनपाला दिला असल्याची माहिती सज्जाद हुसेन यांनी यावेळी दिली. यावेळी असो.चे सचिव सुनील ढोमणे, उपाध्यक्ष प्रकाश बालचंदानी, सहसचिव गजानन देवर, कोषाध्यक्ष किशोर ढोमणे, सतीश पाटील, अर्शद हुसेन, रफिकोद्दीन, रवी वाधवानी, सज्जाद हुसेन आदी पदाधिकारी उपस्थित होते.