मूर्तिजापूर तालुक्यातील २७ ग्रा.पं.च्या २३५ जागांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:16 AM2021-01-15T04:16:31+5:302021-01-15T04:16:31+5:30

२७ ग्राम पंचायतींच्या २३५ सदस्यांच्या निवडणुकीसाठी २४२ पुरुष व २९२ महिला असे ५३४ उमेदवार रिंगणात आहेत. २५३९८ पुरुष व ...

Polling for 235 seats of 27 villages in Murtijapur taluka today | मूर्तिजापूर तालुक्यातील २७ ग्रा.पं.च्या २३५ जागांसाठी आज मतदान

मूर्तिजापूर तालुक्यातील २७ ग्रा.पं.च्या २३५ जागांसाठी आज मतदान

Next

२७ ग्राम पंचायतींच्या २३५ सदस्यांच्या निवडणुकीसाठी २४२ पुरुष व २९२ महिला असे ५३४ उमेदवार रिंगणात आहेत. २५३९८ पुरुष व २३९५३ महिला असे ४९३५१ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तलाठी विशाल काटोले यांनी तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनात केलेल्या नियाेजनानुसार ४८८ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी, तसेच १०७ पाेलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली पथके कर्तव्यावर रवाना झाली. आज पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप पवार यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले. परदानशीन महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी २७ मतदान केंद्रांवर २७ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मतदान पथकांना मदत करण्यासाठी ९ निवडणूक निर्णय अधिकारी व १८ सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच मतदान यंत्रांमधील अडचणी सोडविण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेवर निरीक्षक म्हणून बाळापूरचे एसडीओ रामेश्वर पुरी लक्ष ठेवणार आहेत. ग्रा. पं. निवडणुकीसाठी आज निवडणुकीसाठी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० दरम्यान मतदान होणार आहे.

........

या २७ ग्रामपंचायतसाठी होणार मतदान

पारद, भटोरी, मंगरुळ कांबे, गोरेगाव, लाखपुरी, सिरसो, दुर्गवाडा, सांगवी, टिपटाळा, हिरपुर, कवठा (खोलापूर), बपोरी, कुरूम, माटोडा, कवठा (सोपीनाथ), धामोरी बु, काली, राजुरा घाटे, खांदला, धानोरा (पाटेकर), निभा, विराहीत, कंझरा, अनभोरा, जामठी बु, हातगाव, चिखली या २७ ग्रामपंचायतसाठी मतदान होत आहे.

Web Title: Polling for 235 seats of 27 villages in Murtijapur taluka today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.