मतदान पथकांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:35 PM2019-04-01T13:35:12+5:302019-04-01T13:35:32+5:30
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान पथकांना रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले.
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान पथकांना रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात मतदान पथकांतील अडीच हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सहा विधानसभा मतदारसंघांत मतदान केंद्रनिहाय एक केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकारी अशी मतदान पथके गठित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अकोला पूर्व मतदारसंघातील मतदान पथकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनस्थित छत्रपती सभागृहात मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत चार सत्रात देण्यात आलेल्या प्रशिक्षणात अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील अडीच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणात सहभागी अधिकारी व कर्मचाºयांना निवडणूक निरीक्षक (सामान्य) गुंजीयाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. मतदान प्रक्रियेच्या प्रशिक्षणानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना शहरातील आरडीजी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले.