२६२ ग्रामपंचायतींमध्ये आज होणार मतदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:41 AM2017-10-07T02:41:55+5:302017-10-07T02:42:09+5:30

अकोला: जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये १0 ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाल्याने, २६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ८0४ मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान घेण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, मतदान पथके शुक्रवारी मतदान केंद्रांवर रवाना झाली.

Polling will be held today in 262 Gram Panchayats! | २६२ ग्रामपंचायतींमध्ये आज होणार मतदान!

२६२ ग्रामपंचायतींमध्ये आज होणार मतदान!

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक ८0४ मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये १0 ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाल्याने, २६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ८0४ मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान घेण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, मतदान पथके शुक्रवारी मतदान केंद्रांवर रवाना झाली.
पाच वर्षांचा कालावधी संपणार्‍या जिल्हय़ातील सातही तालुक्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत आहेत. उमेदवारी मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत जिल्हय़ात २७२ ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध करण्यात आली. त्यामध्ये १७ सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी ७७७ उमेदवारांची अविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे जिल्हय़ातील २६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. 
त्यामध्ये २४६ सरपंच पदांसह १ हजार १६७ ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी जिल्हय़ातील ८0४ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली असून, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकार्‍यांची पथके इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व मतदान साहित्यासह शुक्रवारी मतदान केंद्रांवर रवाना झाली. 
या मतदानात सरपंच आणि सदस्य पदांसाठी निवडणूक रिंगणातील ३ हजार ६५१ उमेदवारांचे भाग्य मतदार ठरविणार आहे. त्यामध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांचा समावेश आहे.

२ लाख ८९ हजार मतदार ठरविणार उमेदवारांचे भाग्य!
जिल्हय़ातील २६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी घेण्यात येणार्‍या मतदान प्रक्रियेत निवडणूक सरपंच आणि सदस्य पदांसाठी निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे भाग्य २ लाख ८९ हजार ६४ मतदान ठरविणार आहेत. त्यामध्ये अकोला - ५२ हजार १६१, अकोट -४९ हजार ३१९, तेल्हारा -२९ हजार ६८४, मूर्तिजापूर -५५ हजार ७२७, बाळापूर -२२ हजार ९२१, बाश्रीटाकळी -५0 हजार ६१६ आणि पातूर तालुक्यातील -२८ हजार ६३६ मतदारांचा समावेश आहे.

पोलीस बंदोबस्त तैनात!
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जिल्हय़ातील मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान प्रकियेदरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मतदान केंद्र परिसरात पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे.

Web Title: Polling will be held today in 262 Gram Panchayats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.