मूर्तिजापुरात पॉलिथिन जप्त
By admin | Published: April 22, 2017 01:09 AM2017-04-22T01:09:59+5:302017-04-22T01:09:59+5:30
२३ हजार ५00 रुपयांचा दंड वसूल.
मूर्तिजापूर : नगर परिषद घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २000 व २0१६ प्लास्टिक वेस्टेज कायदा २0१६ अंतर्गत ५0 मायक्रॉनच्या आतील पॉलिथिनवर बंदी घालण्यात आलेली आहे.
या कायद्यांतर्गत २0 एप्रिल रोजी शहरात काही दुकानदारांवर दंडात्मक व जप्तीची कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई ही प्रभारी मुख्याधिकारी वैभव फरतारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
शहरातील स्टेशन तसेच जुनी वस्ती भागातील विविध दुकानांवर धाडी टाकून मुद्देमालासह जप्तीची कारवाई करून २३ हजार ५00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई सचिन चावके, अमोल शिरसाट, नरसिंग चावरे, धनश्री वंजारी, सीमा चारभे, नम्रता देशपांडे, शिरीष गावंधी, मसरुल खान, विजय कोरडे, शालीकराम यादवर, शिवराम देशमुख, संतोष शाहकर इत्यादी कर्मचार्यांनी सहकार्य केले.