कोरोना काळात तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:31 AM2021-05-05T04:31:05+5:302021-05-05T04:31:05+5:30

अनेक पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत, कोरोना काळात लोकांची मदत करीत आहेत. पोलीस कर्मचारी हिंमत दंदी ...

Ponds for thirsty birds during the Corona period | कोरोना काळात तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाणवठे

कोरोना काळात तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाणवठे

Next

अनेक पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत, कोरोना काळात लोकांची मदत करीत आहेत. पोलीस कर्मचारी हिंमत दंदी सतत काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करतात. अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी हिंमत दंदी यांनी पक्ष्यांसाठी अकोट शहर बस स्टॅन्ड परिसर, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, तहसील कार्यालय, नगर परिषद , अकोट शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी पाणवठे लावले आहेत. यावेळी अकोट शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार सनक, मुख्याधिकारी वाहूरवाघ, नायब तहसीलदार हरीश गुरव, सहायक पोलीस निरीक्षक शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे, पोलीस कर्मचारी बेले, डोंगरदिवे, वाठोरे, पचांग, सामाजिक कार्यकर्ते रोशन चिंचोळकर, ऋत्विक सोनटक्के, अक्षय अवचार, संदेश एकीरे, गणेश पुनकर आदी मंडळी उपस्थित होती.

फोटो:

Web Title: Ponds for thirsty birds during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.