प्रशासकीय अनास्थेमुळे जांब-पाचरण रस्त्याची दुरवस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:12 AM2020-12-07T04:12:55+5:302020-12-07T04:12:55+5:30
सद्य:स्थितीत रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. पावसामुळे रस्त्यावरील सर्व माती वाहून गेली आहे. परिणामी अनेक ठिकाणी नाल्या, खड्डे ...
सद्य:स्थितीत रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. पावसामुळे रस्त्यावरील सर्व माती वाहून गेली आहे. परिणामी अनेक ठिकाणी नाल्या, खड्डे पडले आहेत. गिट्टी उखडून गिट्टीचे आणि दगडांचे रस्त्यात ढीग साचले आहेत. रस्त्याने वाहन चालवणे अवघड झाले आहे. अनेकदा अपघात घडून नागरिकांच्या जिवावर बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. काहींना अपंगत्व आले आहे. रस्ता खराब असल्यामुळे वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. जांब-पाचरण या दोन्ही खेडेगावांचे अत्यावश्यक सेवा व आर्थिक व्यवहार आलेगावशी जोडलेले आहेत. पर्यायी मार्ग नसल्याने ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. हा मार्ग एक प्रकारे मृत्यूचा सापळा बनला आहे. संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन या मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांसह प्रवाशांकडून होत आहे.
फोटो: