पिंपळखुटा-खेट्री-चतारी रस्त्याची दयनीय अवस्था !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:26+5:302021-04-10T04:18:26+5:30
ग्रामस्थांसह वाहनचालक त्रस्त : अपघाताची शक्यता वाढली ! पिंपळखुटा : पिंपळखुटा-खेट्री-चतारी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य ...
ग्रामस्थांसह वाहनचालक त्रस्त : अपघाताची शक्यता वाढली !
पिंपळखुटा : पिंपळखुटा-खेट्री-चतारी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती त्वरित करण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनचालकांकडून होत आहे.
पिंपळखुटा परिसरातील सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पिंपळखुटा- खेट्री - चतारी या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले आहे. वाहनधारकांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर गिट्टी उखडली असून, यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. पिंपळखुटा परिसरातील ग्रामस्थांकरिता हा एकमेव रस्ता असल्याने या मार्गावर वर्दळ असते. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन पिंपळखुटा-खेट्री-चतारी रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. (फोटो)
---------------------
पिंपळखुटा-खेट्री-चतारी रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे चांगेफळवासीयांचे हाल होत आहेत. तसेच अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. या मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी.
-अजय काळे, ग्रामस्थ, चांगेफळ