रोहनखेड-कुटासा रस्त्याची दयनीय अवस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:22 AM2021-02-25T04:22:52+5:302021-02-25T04:22:52+5:30
रोहनखेड : गत काही वर्षांपासून रोहनखेड-कुटासा या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, वाहनधारक त्रस्त झाले आहेत. ...
रोहनखेड : गत काही वर्षांपासून रोहनखेड-कुटासा या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याकडे संंबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
रोहनखेड-कुटासा या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. जिल्ह्याशी जोडणारा हा एकमेव रस्ता असल्याने या मार्गावर रहदारीचे प्रमाण अधिक असते. या रस्त्याने विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात. रोहनखेड-कुटासा रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने रस्त्याने वाहन चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. पाच वर्षांपूर्वी रस्त्याचे सुमारे एक कि.मी. डांबरीकरण करण्यात आले होते; मात्र चार किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण रखडले. तेव्हापासून रस्त्याची स्थिती ‘जैसे थे’ असल्याने रस्ता कधी होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती त्वरित पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.