तूर खरेदी गैरप्रकाराची होणार चौकशी!
By admin | Published: June 10, 2017 02:32 AM2017-06-10T02:32:55+5:302017-06-10T02:32:55+5:30
आजपर्यंत ३ लाख ९६ हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ात आजपर्यंत ३ लाख ९६ हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. याबाबतचा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी आढावा घेतला. यासंदर्भात नाफेडचे विपणन अधिकारी मनोज वाजपेयी यांनी पालक मंत्र्यांना ही माहिती दिली. दरम्यान, तुर खरेदी गैरप्रकाराची चौकशी होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
अकोला, अकोट, तेल्हारा, बाश्रीटाकळी व मूर्तिजापूर येथील तूर खरेदीची माहिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली. तूर खरेदीमधील गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी तालुका उपनिबंधक, ऑडिटर, पोलीस अधीक्षक व महसूल अधिकारी यांची समिती गठित करू न त्याद्वारे चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. ३१ मेपर्यंत टोकन दिले असलेल्या शेतकर्यांची तूर खरेदी करण्यात येणार असल्याचे यावेळी विपणन अधिकारी वाजपेयी यांनी दिली.