नव्या कृषी कायद्यांमुळे शेतीक्षेत्रात सकारात्मक बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:16 AM2021-02-08T04:16:57+5:302021-02-08T04:16:57+5:30
अकोट : जुन्या कायद्यांमुळे शेतीक्षेत्र अडचणीत आले होते. त्याचा विपरीत परिणाम शेतीक्षेत्रावर झाला. त्याची परिणती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये झाली. तेव्हा ...
अकोट : जुन्या कायद्यांमुळे शेतीक्षेत्र अडचणीत आले होते. त्याचा विपरीत परिणाम शेतीक्षेत्रावर झाला. त्याची परिणती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये झाली. तेव्हा हे कायदे बदलणे अपरिहार्य होते. कोरोनामुळे व्यवसाय अडचणीत आले. औद्योगिक मालाचा ग्राहक मंदावला. याचा परिणाम उद्योग जगतावर व देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावर झाला. यामुळे देशात ५५ टक्के शेतीक्षेत्र असलेल्या लोकांच्या खिशात पैसा आला तरच देशात ग्राहक निर्माण होतील. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने जुन्या कायद्यात बदल करून नवीन कायद्याची निर्मिती केली. या कायद्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर सारून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ललित पाटील बहाळे यांनी केले.
शेतकरी संघटनेचे नेते ललित पाटील बहाळे यांची संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यानिमित्त शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शनिवारी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजानन पुंडकर होते. कार्यक्रमाला माधवराव गावंडे, सतीशबाबा देशमुख, गजानन पाटील दुधाट, विठ्ठलराव गुजरकर, अजाबराव मोकळकर यांची समायोचित भाषणे झाली. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती बाजार समितीच्या सभापती भारती गावंडे, प्रमिला भारसाकळे, राजाभाऊ देशमुख, बाळासाहेब फोकमारे, विलासराव ताथोड, नीलेश पाटील, दादाभाऊ टोहोरे जियाउद्दीन मेंबर, मधु कोल्हे, इमायत हुसेन, दिनेश देऊळकार, संजय ढोकणे, अनंतराव तळोकार, गोपाल भाकरे, गजानन खोटरे, दिलीप गावंडे, सुरेश सोनोने, महेश उमाळे, मंगेश रेळे, आकाश देऊळकार, अजित कळसकर, गजानन मोहोकार, मोहन खिरोडकार, मकसूद मुल्लाजी, दिनेश गिऱ्हे, संतोष तायडे, प्रवीण गैधर, जाफर खा, गोपाळ निमकर्डे उपस्थित होते. शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या कमल सारभुकन व मानवेंद्र काचोळे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. प्रास्ताविक लक्ष्मीकांत कौठकर यांनी केले. सूत्रसंचालन संदीप मंगळे यांनी केले. आभार नीलेश नेमाडे यांनी मानले.
फोटो :