विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता!
By admin | Published: August 11, 2015 10:39 PM2015-08-11T22:39:58+5:302015-08-11T22:39:58+5:30
विदर्भात अहेरीला ५ से.मी. तर वाशिमला १ से.मी. पावसाची नोंद.
अकोला : येत्या ४८ तासात कोकण-गोवासह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. राज्यात पावसाच्या पुनरागमनानंतर अधून-मधून तुरळक ठिकाणी पाऊस येत आहे; परंतु पश्चिम विदर्भातील पावसाचा जोर ओसरला आहे.
सध्या उत्तर प्रदेशच्या उत्तर-दक्षिण ओडिशाच्या किनार्यालगत असलेल्या पश्चिम-मध्य व वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मागील चोवीस तासात विदर्भातील अहेरी येथे ५ से.मी., धामणगाव, सडकअर्जुनी, सालेकसा, झरीजामणी येथे प्रत्येकी ३ से.मी., आमगाव, भिवापूर, चांदूर, चिखलदरा, धारणी, हिंगणा,कोपणी, पेरसेवणी, सावनेर व वाशिम येथे प्रत्येकी १ से.मी. पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावरील कोयना नवजा येथे २ से.मी., अम्बोणे, डुगरवाडी, कोयना पोफळी, ताम्हिणी व धारावी येथे प्रत्येकी १ से.मी. पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील गिरणा धरण येथे ४ से.मी. राहुरी, चांदवड, गगनबावडा, महाबळेश्वर, नांदगाव व मोहोळ येथे प्रत्येकी १ से.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. मराठवाड्यात मुखेड येथे ४ से.मी. चाकुर, खुलताबाद, माजलगाव ३ से.मी.,अहमदपूर,अंबड, धनसांगवी, तुळजापूर, २ से.मी.,अंबेजोगाई, बीड, गेवराई,जालना, कन्नड, किनवट, परतूर, रेणापूर, सेनगाव, उमरगा, वैजापूर या ठिकाणी प्रत्येकी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावली आहे.
येत्या १२ व १३ ऑगस्टपर्यंत कोकण-गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, १४ व १५ ऑगस्ट रोजी राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १२ ते १७ ऑगस्टपर्यंत पुणे व परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरू पाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई व परिसरात १२ व १३ ऑगस्ट रोजी पावसाच्या सरी कोसळतील.