लॉकडाऊनची शक्यता; बेफिकीर जनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:16 AM2021-04-05T04:16:58+5:302021-04-05T04:16:58+5:30
--बॉक्स-- येथे भरला कोरोनाचा ‘बाजार’ शहरातील भाजी बाजारात रविवार असल्याने भाजीपाला खरेदीसाठी गर्दी झाली होती. अनेक नागरिकांच्या चेहऱ्यांवर मास्क ...
--बॉक्स--
येथे भरला कोरोनाचा ‘बाजार’
शहरातील भाजी बाजारात रविवार असल्याने भाजीपाला खरेदीसाठी गर्दी झाली होती. अनेक नागरिकांच्या चेहऱ्यांवर मास्क नव्हते. विक्रेत्यांनीही मास्क घातले नव्हते. सोशल डिस्टन्सिंग नाही. या परिस्थितीमुळे हा भाजी बाजार? आहे की कोरोनाचा बाजार? असा प्रश्न पडला होता.
--बॉक्स--
बसस्थानकावर हजारोंचा एकमेकांशी संपर्क
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून दरदिवशी शेकडो बसगाड्या परजिल्ह्यात जातात आणि येतातही. या बसगाड्यांद्वारे हजारो प्रवासी प्रवास करतात. येथे सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे आहे; मात्र महामंडळाची सक्ती प्रवाशांच्या पथ्यावर पडताना दिसून येत नाही. बसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवासी एकच धूम ठोकत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
--बॉक्स--
ऑटोचालकांचा मास्क हनुवटीवर
नो मास्क, नो सवारी मोहीम राबविणारे ऑटोचालकांचा स्वत:चा मास्क हनुवटीवर आला आहे. त्यात ना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही होते ना मास्क लावला जातो. प्रवाशांनी गच्च भरून ऑटो रस्त्यांवरून धावत आहेत.
--बॉक्स--
नियम तुडविले पायदळी!
कोरोनाबाधेच्या भयानकतेने प्रारंभीच्या काळात नागरिकही मोठी दक्षता घेत होते. आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. पण, प्रशासनाचे नियम पूर्णपणे पायदळी तुडविले जात आहेत. बाजारपेठेतील दुकानांमध्ये ग्राहकांची चिक्कार गर्दी होत आहे. समोर सॅनिटायझरची एक बॉटल प्रदर्शनार्थ ठेवलेली वस्तू असल्यासारखी दिसून येत आहे.
--बॉक्स--
मास्क हेच हत्यार, तरीही फिरताय विनामास्क
शहरात काही काम नसताना नागरिक पायी व वाहने घेऊन फिरताना आढळून येत आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तोंडावर मास्क गरजेचा आहे; मात्र नागरिक विनामास्क फिरत आहेत.
--बॉक्स--
किराणा बाजार, वाढवितोय आजार!
शहरातील किराणा बाजारात दररोज वर्दळ असते. जीवनावश्यक वस्तूंमध्ये किराणा समाविष्ट असल्याने या दुकानांना लॉकडाऊनमध्येही सूट मिळते. या ठिकाणीच कोविड नियमांचे पालन होत नाही. भाजी बाजाराप्रमाणे येथेही नागरिक गर्दी करत आहे. एक छोट्या दुकानासमोर सहा-सात ग्राहक सोशल डिस्टन्सिंग न पाळता उभे राहतात.