ग्रामपंचायत सरपंच पद सर्वसाधारण निघाल्याने निवडणुकीची रंगत वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:14 AM2020-12-09T04:14:53+5:302020-12-09T04:14:53+5:30
बोरगाव वैराळे येथील ग्रामपंचायतच्या कार्यकाल ३१ ऑगस्ट २०२० संपला असून तेव्हापासून ग्रामपंचायतचा कारभार प्रशासक पाहत आहेत. मागील महिनाभरापासून ग्रामपंचायत ...
बोरगाव वैराळे येथील ग्रामपंचायतच्या कार्यकाल ३१ ऑगस्ट २०२० संपला असून तेव्हापासून ग्रामपंचायतचा कारभार प्रशासक पाहत आहेत. मागील महिनाभरापासून ग्रामपंचायत निवडणूक घेण्याची पूर्वतयारी शासनाकडून सुरू करण्यात आली असून गावातील तीन वाॅर्डात ७ सदस्य निवडून देण्यासाठी प्रत्येक वाॅर्डात कशाप्रकारे आरक्षण राहील याची संपूर्ण तयारी करून तिन्ही वाॅर्डाच्या मतदार याद्या १ डिसेंबरला ग्रामपंचायतीच्या नोटीस बार्डावर प्रसिद्ध करण्यात येऊन ७ डिसेंबरपर्यंत आक्षेप मागविण्यात आले व ८ डिसेंबरला तहसील कार्यालय बाळापूर येथे तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पद कुणासाठी आरक्षित आहे हे जाहीर करण्यात आले. त्यामध्ये बोरगाव वैराळे येथील ग्रामपंचायतचे सरपंच पद हे सर्वसाधारण म्हणून जाहीर झाले असे असले तरी सर्वसाधारण महिला की पुरुष, हे ११ डिसेंबरला जिल्हाधिकारी अकोला कार्यालयात जाहीर होणार आहे. सर्वसाधारण सरपंच पद असल्याने अनेकांच्या मनात नवी उमेद जागृत झाली असून, यावर्षी च्या निवडणुकीत चांगलीच रंगत वाढणार आहे.