‘पंदेकृवि’ कुलगुरू  पदासाठी आता लॉबिंग सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:55 AM2017-08-15T01:55:45+5:302017-08-15T01:56:11+5:30

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नवीन  कुलगुरू  पदाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, राज्या तील कृषी विद्यापीठांसह भारतीय कृषी संशोधन परिषदेचे  वरिष्ठ शास्त्रज्ञ कुलगुरू  पदाच्या स्पर्धेत उतरले आहेत. या  पदासाठी आता लॉबिंग सुरू  झाली असल्याचे वृत्त राज्या तील कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ, कर्मचारी वतरुळात आहे. 

For the post of 'Pandekruvi' now, lobbying starts! | ‘पंदेकृवि’ कुलगुरू  पदासाठी आता लॉबिंग सुरू !

‘पंदेकृवि’ कुलगुरू  पदासाठी आता लॉबिंग सुरू !

Next
ठळक मुद्दे१४ दिग्गज स्पर्धेत; अनेक नावांवर तर्कविर्तकसमिती पाठवणार राज्यपाल यांच्याकडे नावे!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नवीन  कुलगुरू  पदाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, राज्या तील कृषी विद्यापीठांसह भारतीय कृषी संशोधन परिषदेचे  वरिष्ठ शास्त्रज्ञ कुलगुरू  पदाच्या स्पर्धेत उतरले आहेत. या  पदासाठी आता लॉबिंग सुरू  झाली असल्याचे वृत्त राज्या तील कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ, कर्मचारी वतरुळात आहे. 
 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू   पदासाठी यावेळी १४ नावे समोर आली आहेत. यामध्ये  महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे. नऊ जण हे  भारतीय कृषी संशोधन परिषदेशी निगडित विविध संशोधन  विभागात वरिष्ठ पदावर आहेत. हे पद जेवढे संशोधन,  शिक्षण, विस्तार कार्याशी निगडित आहे, तेवढेचे मानाचे  आहे. त्यामुळे या पदासाठीची स्पर्धा अनिवार्यच असते.  यावेळी तर १४ जण कुलगुरू पदासाठीच्या  स्पर्धेत आहेत.  हे पद आपणास मिळावे, यासाठी यातील काहींनी व त्यांच्या  सहकार्‍यांनी लॉबिंग सुरू  केली असल्याचे वृत्त सध्या कृषी  विद्यापीठ शास्त्रज्ञांमध्ये जोरात आहे. दरम्यान, या भागाची,  मातीची, माणसाची माहिती असलेला कुलगुरू  असावा,  असे राज्यातील या कृषी संस्थाशी निगडित नेते, कृषी  शास्त्रज्ञांना वाटते, तर अनेकांनी यासाठी राज्यपाल, मु ख्यमंत्री व कृषी मंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.
दरम्यान, या सर्व प्रक्रियेत व्यक्तिगत माहिती (बायोडाटा)  कशी आहे, संशोधन, संशोधन पेपर्स, अनुभव व कोणत्या  पदावर कसे काम केले आदींची सूक्ष्म माहिती समितीद्वारे  बघितली जाणार आहे. 
-

Web Title: For the post of 'Pandekruvi' now, lobbying starts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.