परसबागेतील कुक्कुटपालन ग्रामीण महिलांकरिता एटीएमसारखे - अनिल भिकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:14 AM2021-06-20T04:14:38+5:302021-06-20T04:14:38+5:30

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा कृषी उपसंचालक अरुण वाघमारे यांनी परसबागेतील कुक्कुटपालन केल्याने ग्रामीण भागात दैनंदिन गरजा भागविल्या ...

Poultry farming in the backyard is like an ATM for rural women - by Anil Bhika | परसबागेतील कुक्कुटपालन ग्रामीण महिलांकरिता एटीएमसारखे - अनिल भिकाने

परसबागेतील कुक्कुटपालन ग्रामीण महिलांकरिता एटीएमसारखे - अनिल भिकाने

Next

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा कृषी उपसंचालक अरुण वाघमारे यांनी परसबागेतील कुक्कुटपालन केल्याने ग्रामीण भागात दैनंदिन गरजा भागविल्या जाऊ शकतात, असे सांगितले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते “परसबागेतील शास्त्रोक्त कुक्कुटपालन” या तांत्रिक माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले व प्रशिक्षणार्थींना वाटप करण्यात आले. याप्रसंगी आत्मा अकोलाचे योगेश देशमुख, वरुण दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणात कोंबड्यांचे व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, आजार व त्यावरील उपचार व विक्री व्यवस्था या विषयांवर महाविद्यालयाचे तज्ज्ञ प्रा. डॉ. सतीश मनवर व डॉ. एम. आर. वडे यांनी मार्गदर्शन केले. संचालन डॉ. एम. आर. वडे यांनी तर, आभार डॉ. गिरीश पंचभाई यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पी. एल. ठाकूर यांनी मोलाचे योगदान दिले.

Web Title: Poultry farming in the backyard is like an ATM for rural women - by Anil Bhika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.